चौकट
निधोना येथे रेल्वेस्थानक
समृद्धी महामार्गाचा इंटरचेंज पॉइंट हा निधोना येथेच होणार आहे. त्याचे कामही सुरू झाले आहे. आता बुलेट ट्रेनचे रेल्वेस्थानकही निधोना येथेच होणार असल्याचे मंगळवारी सांगण्यात आले. दरम्यान, या प्रकल्पासाठी जिल्ह्यातून जवळपास ४३ किलोमीटर अंतराचा टप्पा जाणार आहे. त्यासाठी जालना तालुक्यातील १४ गावे आणि जवळपास ११ गावे ही बदनापूर तालुक्यातील असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
चौकट
साडेतीन तासांत मंबई गाठणे शक्य
मुंबई ते नागपूर अशी बुलेट ट्रेन सुरू करण्याचा विचार सरकारकडून केला जात आहे. त्यासाठी सर्वेक्षण सुरू आहे. ही बुलेट ट्रेन सुरू झाल्यास नागपूर ते मुंबई हे ५०० किलोमीटरचे अंतर केवळ साडेतीन तासात कापता येणार आहे. या रेल्वेचा प्रतितास वेग हा चक्क ३३० प्रतिकिलोमीटर एवढा प्रचंड राहणार आहे. या रेल्वेतून ७५० प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. ही रेल्वे समृद्धी महामार्ग जवळून सिमेंटचे पीलर-खांब उभे करून त्यावरून ती धावणार आहे.