शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात ज्वालामुखी? व्हायरल व्हिडिओमागचं धक्कादायक सत्य आलं समोर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 12:01 IST

जमिनीत लाव्हा नव्हे, तांत्रिक बिघाड! महावितरणने सामनगाव रोडवरील 'त्या' व्हिडिओवर दिला स्पष्ट खुलासा.

जालना: शहरातील सामनगाव रोड परिसरात जमिनीतून लाव्हासारखा लालभडक पदार्थ बाहेर येत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने ५ एप्रिल रोजी नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली होती. अनेकांनी हा ज्वालामुखी असल्याचा दावा केला होता, मात्र महावितरणने या घटनेमागील तांत्रिक बिघाडाचे सत्य समोर आणले आहे. हा कोणताही नैसर्गिक चमत्कार नसून, विद्युत खांबावरील तांत्रिक दोष आणि खडकाळ जमिनीमुळे घडलेला प्रकार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. महावितरणच्या पथकाने तातडीने घटनास्थळी पोहोचून हा बिघाड दुरुस्त केला असून वीजपुरवठा पूर्ववत केला आहे.

हाय व्होल्टेज प्रवाहामुळे वितळले खडकमहावितरणने दिलेल्या माहितीनुसार, सामनगाव रोडवरील ११ केव्ही सॅटेलाइट फीडरचा कंडक्टर तांत्रिक बिघाडामुळे 'व्ही-क्रॉस आर्म' आणि 'आरएसजे पोल'च्या संपर्कात आला. यामुळे उच्च दाबाचा विद्युत प्रवाह पोलमधून थेट जमिनीत उतरला. ज्या ठिकाणी हा विद्युत प्रवाह उतरला, ती जागा अत्यंत खडकाळ आहे. अपुऱ्या अर्थिंगमुळे आणि विद्युत प्रवाहाच्या प्रचंड तीव्रतेमुळे तिथे मोठी उष्णता निर्माण झाली. या उष्णतेने तेथील खडक वितळले आणि ते लाव्हासारखे लालभडक दिसू लागले. नागरिकांनी याच दृश्याचा व्हिडिओ बनवून तो ज्वालामुखी म्हणून व्हायरल केला होता.

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनघटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि महावितरणने संयुक्तपणे कारवाई केली. रविवारी सायंकाळी ४:४५ वाजता दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. "हा केवळ तांत्रिक दोष होता, कोणतीही नैसर्गिक आपत्ती नाही," असे महावितरणचे प्र. अतिरिक्त कार्यकारी अभियंता सचिन घुलाने यांनी स्पष्ट केले आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी परिसरातील सर्व विद्युत खांबांची नव्याने अर्थिंग केली जाणार आहे. सोशल मीडियावर पसरणाऱ्या कोणत्याही भीतीदायक अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Jalna 'Volcano' Video: Truth Revealed Behind Viral Incident

Web Summary : Viral Jalna 'volcano' video was high-voltage electrical fault, not natural. Overheated rocks melted, mimicking lava. Power restored; avoid social media rumors.
टॅग्स :mahavitaranमहावितरणJalanaजालना