शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

यानंतर उपोषण नाही, निवडणुकीत उतरणार अन् नावं घेऊन उमेदवार पाडणार: मनोज जरांगे

By विजय मुंडे  | Updated: June 13, 2024 16:14 IST

मराठा आरक्षणासाठी एक महिन्यांचा वेळ, मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित

जालना : आम्हाला आमच्या हक्काचे ओबीसीतील आरक्षण द्यावे. आमच्या मागण्यांसाठी आजपासून सरकारला एक महिन्यांचा वेळ देतो. परंतु, मागण्या मान्य न झाल्यास आपण निवडणुकीत उतरणार आणि नावे घेवून उमेदवार पाडणार असा इशारा देत जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केले. जरांगे पाटील यांनी मागण्यांची पूर्तता करण्यासाठी शासनाला एक महिन्याचा वेळीही दिला आहे.

शासनाचे प्रतिनिधी म्हणून राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, खा. संदीपान भुमरे, आ. राणा पाटील, आ. राजेंद्र राऊत यांनी गुरूवारी दुपारी जरांगे पाटील यांची भेट घेवून चर्चा केली. आम्ही दिलेल्या व्याख्येप्रमाणे सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी, सापडलेल्या ५७ लाख नोंदींचा आधार घेत मराठा आणि कुणबी एकच आहेत असा कायदा पारित करावा, हैदराबादचे गॅझेट लागू करावे, सातारा संस्थानचे गॅझेट लागू करावे, अंतरवालीसह राज्यातील सर्व गुन्हे मागे घ्यावेत. कुणबी नोंदी शोधणाऱ्या समितीला रद्द न करता वारंवार कुणबी नोंदी शोधण्यास सूचित करावे. ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना तातडीने प्रमाणपत्र वाटप करावेत यासह इतर मागण्या जरांगे पाटील यांनी शंभूराज देसाई यांच्याकडे केल्या. मागण्या मान्य नाही झाल्या तर आपण राजकारणात उतरणार, नावे घेवून उमेदवार पाडणार, प्रसंगी काही ठिकाणी उमेदवार देणार नाही परंतु, पण नावे घेवून पाडणार, असा इशारा जरांगे यांनी दिला. देसाई यांनी जरांगे यांच्या मागण्यांबाबत एक महिन्यांचा वेळ शासनाला मागितला होता. त्यानुसार जरांगे यांनी एक महिन्यांचा वेळ देत उपोषण स्थगित केले.

उद्याच बैठक घेणार : देसाईलोकसभा निवडणुकीमुळे अधिकारी, कर्मचारी निवडणूक कामात होते. त्यामुळे काही वेळ गेला आहे. आता सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करणे यासह मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागण्यांबाबत आपण स्वत: पाठपुरावा करणार आहोत. उद्याच बैठक घेवून चर्चा केली जाईल. गुन्हे मागे घेण्याची प्रक्रियाही सुरू आहे. जरांगे यांच्या तब्येतीची सरकारलाही काळजी असल्याचे देसाई यावेळी म्हणाले.

आता अंतरवाली सराटी नकोअंतरवाली सराटी गावातील सर्वच जातीधर्माच्या लोकांनी मला प्रेम दिलं आहे. परंतु, काहीजण कटकारस्थान रचीत आहेत. त्यामुळे आता अंतरवाली सराटीत उपोषण नको, असा संदेश जरांगे पाटील यांनी ग्रामस्थांना दिला. आता शासनाने आरक्षण दिलं नाही तर आपणच निवडणुकीत उतरणार असल्याचा पुर्रूच्चारही त्यांनी कला.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलJalanaजालनाMaratha Reservationमराठा आरक्षण