शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

स्वच्छतेसाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 23:30 IST

स्वच्छ सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत शहरातील सर्व स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिका-यांची बैठक सोमवारी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात घेण्यात आली.

जालना : आपले शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी शहरातील स्वयंसेवी संस्थांनी योगदान द्यावे, असे प्रतिपादन नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी केले.स्वच्छ सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत शहरातील सर्व स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिका-यांची बैठक सोमवारी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात घेण्यात आली. त्या वेळी त्या बोलत होत्या. उपनगराध्यक्ष राजेश राऊत, मुख्याधिकारी संतोष खांडेकर, सर्व विषय समित्यांचे सभापती आणि नगरसेवकांची प्रमुख उपस्थिती होती. गोरंट्याल म्हणाल्या की, पदभार स्वीकारल्यानंतर आपण प्रथम प्राधान्य स्वच्छतेच्या कामाला दिले. पालिकेकडे उपलब्ध मनुष्यबळाच्या माध्यमातून शहर स्वच्छतेसाठी आवश्यक प्रयत्न सुरू आहेत. स्वच्छ सर्वेक्षण कार्यक्रमाअंतर्गत स्वच्छ व सुंदर शहर ही संकल्पना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी व्यापारी, उद्योजक, सामाजिक संघटनांच्या पदाधिका-यांनी पुढाकार घेऊन काम करावे. मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी स्वच्छ सर्वेक्षण राबवण्यामागील उद्देश सांगून सर्वेक्षण यशस्वीपणे राबवण्यासाठी नगरसेवकांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. बैठकीत उपस्थित स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिका-यांनी उपयुक्त सूचना मांडल्या.