शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

नवविवाहित गर्भवती जावांचा विहिरीत अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 00:44 IST

घनसावंगी : शेतात कापूस वेचणीसाठी गेलेल्या दोन नवविवाहित गर्भवती जावांचा सोमवारी सकाळी विहिरीत पडून मृत्यू झाला. घनसावंगी तालुक्यातील मच्छिंद्र ...

घनसावंगी : शेतात कापूस वेचणीसाठी गेलेल्या दोन नवविवाहित गर्भवती जावांचा सोमवारी सकाळी विहिरीत पडून मृत्यू झाला. घनसावंगी तालुक्यातील मच्छिंद्र चिंचोली वाडी येथे ही घटना घडली. जयश्री अंगद बुधनर (१९) व मुक्ता पोपट बुधनर (१९) अशी मृत महिलांची नावे आहेत.जयश्री व मु्क्ता सकाळी कापूस वेचणीसाठी शेतात गेल्या होत्या. दोघीही अकराच्या सुमारास बाजूच्या शेतातील रामेश्वर शिंदे यांच्या विहिरीवर पाणी पिण्यासाठी गेल्या. त्या वेळी विहिरीत पडून त्यांचा मृत्यू झाला. शेतमालक शिंदे दुपारी विहिरीवर गेले असता, त्यांना विहिरीजवळ दोघींच्या चपला व पाण्यावर कपडे तरंगताना दिसले. शिंदे यांनी दोघींचे नातेवाईक नामदेव वायशे यांच्याशी संपर्क साधला. स्थानिक नागरिकांनी दोघींचे मृतदेह बाहेर काढले. दुपारी चारच्या सुमारास पोलिसांनी पंचनामा केला.घटनेची माहिती मिळताच जयश्री व मुक्ता यांच्या माहेरीकडील दीडशे ते दोनशे नातेवाईक घटनास्थळी पोहोचले. सासरकडील व्यक्तींवर गुन्हा दाखल करीत नाहीत, तोपर्यंत दोघींचेही मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेत नातेवाईकांनी रात्री पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला. यामुळे काही वेळ तणाव होता.रात्री उशिरा उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश सोनवणे यांनी घनसावंगी पोलीस ठाण्याला भेट देऊन मृतांच्या नातेवाईकांना कारवाईचे आश्वासन दिले.या प्रकरणी मुक्ताचे वडील नामदेव मदने (रा. सेलू) व जयश्रीचे वडील रामदान मासाळ (रा.जिंतूर) यांच्या फिर्यादीवरून सासरकडील अंगत बुधनर, पोपट बुधनर, रामचंद्र बुधनर, मनोहर बुधनर यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक सुनील बोडखे तपास करीत आहेत.---------------दोघीही होत्या गर्भवतीदोघींचे नातेवाईक संतप्त झाल्यामुळे पोलिसांनी तणावाच्या वातावरणातच मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घनसावंगी ग्रामीण रुग्णालयात हलविले. शवविच्छेदनात जयश्री चार तर मुक्ता तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आल्याचे वैद्यकीय अधिका-यांनी सांगितले.