शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
6
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
7
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
8
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
9
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
10
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
11
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
12
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
13
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
14
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
15
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
16
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
17
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
18
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
19
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी

पिकांवर नवे संकट ! बोंडअळीच्या प्रादुर्भावाने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 11:30 IST

डिसेंबरपूर्वी सर्व कापसाची वेचणी करणे गरजेचे

ठळक मुद्देकामगंध सापळे ठरतील संजीवनी 

जालना : जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून बोंडअळीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. या बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जवळपास ४० टक्के क्षेत्र या अळीने व्यापले असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. 

यावर उपाय करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने खबरदारीचे उपाय सुचिवले आहेत. त्यात प्रामुख्याने कामगंध सापळे लावणे, फरदड कापूस न वेचणे, तसेच डिसेंबरपूर्वी सर्व कापसाची वेचणी करणे गरजेचे असल्याचे  कपाशी विषयाच्या तज्ज्ञांनी नमूद केेले आहे. जिल्ह्यात यंदा जवळपास तीन लाख १० हजार हेक्टरवर कपाशीची लागवड केली आहे. आता कापूस वेचणी होऊन अनेक शेतकऱ्यांचा कापूस बाजारात दाखल झाला आहे. अनेक शेतकरी आता मिळेल त्या दराने कापासाची विक्री करताना दिसून येत आहेत. अद्याप बहुतांश शेतकऱ्यांची कापूस वेचणी शिल्लक आहे. त्यामुळे ती त्यांनी तातडीने करून बोंड अळीपासून बचाव करणे शक्य होणार आहे. 

जिल्ह्यात यापूर्वी २०१६ मध्ये बोंडअळीने मोठ्या प्रमाणावर हल्ला चढवून ८० टक्के कपाशीचे नुकसान झाले होते. याहीवेळी तशीच अवस्था असून, आजघडीला ४० टक्के क्षेत्र प्रभावित झाले आहे, यात गुणोत्तर पद्धतीने वाढ होत असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी या हंगामाचा विचार न करता, पुढील वर्षाचा विचार करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. अनेक शेतकरी थेट फेब्रुवारीपर्यंत कापसाची वेचणी करून तो विक्री करतात; परंतु हे आता धोकादायक ठरू शकते. आजही शेतकऱ्यांनी जो कापूस बाजारात आणला आहे, त्यातही काही प्रमाणात बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ही गंभीर बाब असून, या बाेंडअळीची  जनन साखळी तोडण्यासाठी खबरदारी हाच एक ठोस पर्याय असल्याचे सांगण्यात आले. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार कापूस उत्पादकांनी उपाययोजना कराव्यात, असे आवाहनही करण्यात आले आहे.

कामगंध सापळे ठरतील संजीवनी जिल्ह्यात चार वर्षांपूर्वी ज्यावेळी बोंडअळीने थैमान घातले होते. त्यावेळी सर्वात मोठी भूमिका ही कामगंध सापळ्यांनी निभावली होती. आता ही वेळ निघून गेली असली तरी, शेतकऱ्यांनी आहे त्या कपाशीची लवकरात लवकर विल्हेवाट लावावी, तसेच शेतात असलेल्या पऱ्हाटीच्या झाडांचा भुसा करून  त्यापासून खताचे उत्पादन घेता येईल. यासाठी कृषी विज्ञान केंद्राने जालना तालुक्यातील वखारी आणि बदनापूर तालुक्यातील वानडगाव येथे लावलेले कामगंध सापळे यशस्वी झाले आहेत. आतापर्यंत जवळपास दोन लाख कामगंध सापळे लावण्यात आले होते. -अजय मिटकरी, कीटकशास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी