शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
2
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
3
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
4
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
5
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल चामखीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
8
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
9
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
10
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
11
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
12
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
13
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
14
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
15
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
16
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
17
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
18
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
19
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
20
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...

डिजिटल शिक्षण काळाची गरज -येवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 00:46 IST

प्रत्येक तासिकेचे रेकॉर्डीग करुन प्राध्यापकांवर एकप्रकारे निगराणी ठेवली जाणार असल्याने प्राध्यापकानी ती तयारी ठेवावी असे प्रतिपादन डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आजचे युग हे इंटरनेटचे युग म्हणून ओळखले जाते. या युगात डिजिटल शिक्षण पध्दती विकसित होत आहे. ही विकसित होणारी पध्दत काळानुरुप विद्यार्थी, प्राध्यापक आणि महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने लक्षात घेऊन त्यानुसार पावले टाकावी आता महाविद्यालयामध्ये प्रत्येक तासिकेचे रेकॉर्डीग करुन प्राध्यापकांवर एकप्रकारे निगराणी ठेवली जाणार असल्याने प्राध्यापकानी ती तयारी ठेवावी असे प्रतिपादन डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी केले.जेईएस महाविद्यालयात मंगळवारी सायंकाळी हीरक महोत्सव विशेषांकाचे प्रकाशन कुलगुरु येवले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उद्योजक राजेंद्र बारवाले, अ‍ॅड. दिनायर जालनावाला, शिक्षणतज्ज्ञ प्रीती अग्रवाल, जेईएसचे अध्यक्ष पुरुषोत्तम बगडिया, सचिव रामनिवास भक्कड, प्राचार्य जवाहर काबरा आदींची प्रमुख उपस्थिती होती.पुढे बोलताना कुलगुरु येवले म्हणाले की, मराठवाडा विद्यापीठाने अनेक काळानुरुप बदल केले आहे. विद्यापीठांमधून केवळ पदवी प्रदान करण्याचे काम न राहता नवनवीन संकल्पनांवर काम करुन त्यातून उच्च शिक्षित विद्यार्थी घडविली पाहिजे परंतु तसे होत नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखविली. आपण कार्यभार स्वीकारल्यापासून अनेक चांगले बदल केले आहे. मराठवाडा विद्यापीठाबद्दलचा गैरसमज हळूहळू दूर होत असल्याचे ते म्हणाले. भविष्यात पीएचडी प्राप्त प्राध्यापकांना रिसोर्स पर्सनऐवजी केवळ पीएचडी पदवीधारक म्हणून संबोधले जाणार आहे. आज हजारो पीएचडीधारक आहेत परंतु त्यांनी सादर केलेल्या संशोधन प्रबंधांचा समाजासाठी कुठला उपयोग होतो, याचे आत्मचिंतन करण्याची गरजही त्यांनी वर्तविली.एकीकडे बेरोजगारी वाढत असतानाच दुसरीकडे बहुराष्ट्रीय कंपन्यांना पात्र उमेदवार मिळत नाही. केवळ ७ टक्के पदवीधरांनाच रोजगार मिळत आहे. जेईएस महाविद्यालयबद्दल आपण पूर्वीपासून एक दर्जेदार आणि काळानुरुप शिक्षण देणारे महाविद्यालय म्हणून ओळखतो विद्यापीठांवर अंवलबून न राहता आता या महाविद्यालयाच्या व्यवस्थापन आणि प्राध्यापकांनी आॅटोनॉमसची तयारी करुन प्रस्ताव पाठवावा आपण त्यासाठी प्रयत्न करु असे कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी नमूद केले.

 

टॅग्स :collegeमहाविद्यालयuniversityविद्यापीठ