शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

निरक्षर कामगार महिलांना आहे राष्ट्रगीताचे भान; राष्ट्रगीत सुरू होताच होतात सावधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2019 01:06 IST

राष्ट्रगीत सुरू झाल्यावर मोल-मजुरी करणाऱ्या कामगार महिला डोक्यावर विटा, वाळूचे टोपले असले तरी त्या आहेत, त्या स्थितीत सावधान अवस्थेत उभे राहून झेंड्याला सलाम करतात.

- योगेश मोरे 

शेलगाव (जालना ) : भारताचे राष्ट्रगीत जन-गण-मन हे म्हणता येत नाही. परंतु राष्ट्रगीत सुरू झाल्यावर मोल-मजुरी करणाऱ्या कामगारमहिला डोक्यावर विटा, वाळूचे टोपले असले तरी त्या आहेत, त्या स्थितीत  सावधान अवस्थेत उभे राहून झेंड्याला सलाम करतात. 

बदनापूर तालुक्यात सध्या गेल्या काही महिन्यांपासून शेलगाव शाळेचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामावर जवळपास  २० ते २५ महिलाकामगार  कार्यरत आहेत. आज बहुतांश सुशिक्षित लोकही जर शाळे समोरून राष्ट्रगीत सुरू असताना जात असतील ते थांबण्याची तसदी घेत नसल्याचे अनेकवेळा दिसून आले. परंतु राष्ट्रगीताचा सन्मान काय असतो हे त्यांना कधीतरी गावातील शाळेत पहिली-दुसरीपर्यंत शिक्षण घेतांना माहिती झालेला असतो. तोच अनुभव या कामगार महिला आजही तेवढ्याच तन्मयतेने जपत असल्याने सर्वांकडून त्यांचे कौतुक होत आहे. 

या महिला कामगारांच्या या अनोख्या शिस्तीवर लक्ष गेले ते, शेलगाव येथील जि.प. शाळेत कार्यरत असलेले शिक्षक जगत घुगे यांचे त्यांनी त्याची दखल घेत ही माहिती मुख्याध्यापकांना दिली. त्यांनी त्याची दखल घेऊन या कामगारांपैकी संगीता साळवे आणि सविता साळवे यांचा प्रातिनिधिक स्वरूपात नुकताच सत्कार केला. या शाळेकडून झालेल्या सत्काराने त्या महिला भारावल्या होत्या.  

मी निरक्षर आहे, वडिलांच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे मला शाळेत जाता आले नाही, शिकून देशसेवा करायची माझी इच्छा होती. मला एकच मुलगा आहे. तो सातवीत शिकतो, तरी मुलाने शिकून राष्ट्रसेवा करावी अशी माझी इच्छा आहे.  -संगीता मोकिंद साळवे

मी कधीच शाळेत गेले नाही. पण आता कोठेही कामाला गेले आणि माझ्या कानावर राष्ट्रगीत कानी पडले, तर आम्ही आहे तेथेच थांबतो, एकप्रकारे राष्ट्रसेवेचा आनंद मला त्या ठिकाणी मिळतो.                          - सविता पुंजाराम खंडाळे  

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनNational Anthemराष्ट्रगीतWomenमहिलाLabourकामगार