शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मृतदेह आढळण्याची मालिकाच; ११ दिवसांत आढळलेल्या ६ मृतदेहांच्या घटनांचा अद्याप उलगडा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2021 17:13 IST

Crime News in Jalana मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात मृतदेह आढळण्याची मालिकाच सुरू झाली आहे.

ठळक मुद्देमृत्युच्या कारणांचा उलगडा अद्याप नाहीवाढत्या गुन्हेगारीला रोखण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान

- दीपक ढोले  जालना : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहेत. वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहे. असे असतानाच जिल्ह्यात गेल्या ११ दिवसांत तब्बल ६ जणांचा मृतदेह आढळून आला आहे. याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यांत  अकस्मात मृत्यूची ( Crime In Jalana ) नोंद करण्यात आली आहेत.   

जालना जिल्ह्याचा विस्तार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. वाढत्या विस्ताराबरोबरच गुन्हेगारीचे प्रमाणही वाढले आहेत. वाढत्या गुन्हेगारीला रोखण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. चोरीच्या घटनांमध्ये देखील मोठी वाढ झाली असून, गुन्हेगारीत जालना जिल्हा मराठवाड्यात पहिल्या क्रमांकावर असल्याचे पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी नुकतेच सांगितले होते. जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी कमी करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेसह पोलीस ठाण्यांचे अधिकारी व कर्मचारी  प्रयत्न करीत आहेत. 

त्यातच मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात मृतदेह आढळण्याची मालिकाच सुरू झाली आहे. एक ऑक्टोबरपासून जिल्ह्यात तब्बल सहा जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. यात बदनापूर व जालना शहरात सर्वाधिक मृतदेह आढळून आले आहेत. बदनापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन तर  सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन मृतदेह आढळून आले आहेत.  पारध पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका मुलीचा मृतदेह आढळून आला आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  परंतु, त्यांच्या मृत्यूची कारणे अद्यापही स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे त्यांची हत्या की, आत्महत्या  याचा तपास होणे गरजेचे आहे.   

तपासाला गती मिळणे गरजेचे यातील काहीजण बेपत्ता होते. त्यानंतर दोन ते तीन दिवसांनी त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. विशेष म्हणजे, काहींना आत्महत्या केल्यासारखे दाखविण्यात आले आहे.  या सहा जणांचा मृत्यू कशामुळे झाला,  हे शोधणे गरजेचे आहे.

जिल्ह्यातील क्रमवार घटना : १ ऑक्टोबर रोजी कुंडलिका नदीपात्रात मुकुंद पांडे यांचा मृतदेह आढळला. (सदर बाजार पोलीस ठाणे) ४ ऑक्टोबर रोजी आन्वा येथे १५ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळला. (पारध)  ४ ऑक्टोबर रोजीच नवीन मोंढा भागात गणेश घायाळ यांचा मृतदेह आढळला. (सदर बाजार)८ ऑक्टोबर रोजी १३ दिवसांपासून बेपत्ता असलेला तरूण ऋषिकेश कोळकर याचा मृतदेह आढळला. (बदनापूर)९ ऑक्टोबर रोजी कुंडलिका नदीपात्रात ४० वर्षीय तरूणाचा मृतदेह आढळला. (सदर बाजार)११ ऑक्टोबर रोजी बदनापूर तालुक्यातील सागरवाडी येथे शेख नदीम या युवकाचा मृतदेह आढळला. (बदनापूर) 

लवकरच उलगडा होईलजिल्ह्यात सहा मृतदेह आढळून आले आहेत. या सर्व प्रकरणांचा तपास सुरू आहे. लवकरच त्याचा उलगडा केला जाईल. परंतु, या सर्व आत्महत्या असल्याचा आमचा अंदाज आहे. बदनापूर येथील तरूणाने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.    - विनायक देशमुख, पोलीस अधीक्षक

प्रा. राजन शिंदे यांचा मारेकरी कोण ? कुटुंबातील सदस्यांचे चौकशीत पोलिसांना असहकार्य

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालना