शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पारडगावला वृद्ध इसमाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 01:15 IST

घनसावंगी तालुक्यातील पारडगाव येथे एका इसमाचा गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना सोमावारी सकाळी उघडकीस आली.

लोकमत न्यूज नेटवर्कपारडगाव : घनसावंगी तालुक्यातील पारडगाव येथे एका इसमाचा गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना सोमावारी सकाळी उघडकीस आली. परतूर येथील रहिवासी असलेले अंकुश गायकवाड (७४) हे रविवारी पारडगाव येथे आठवडीबजारात शेळ्या आणण्यासाठी गेले होते. ते रात्री उशिरापर्यंत घरी परत न आल्याने त्यांचा शोध नातेवाईकांनी घेतला. सोमवारी सकाळी अंकुश गायकवाड यांचा मुलगा लक्ष्मण गायकवाड हा वडिलांचा शोध घेण्यासाठी पारडगाव शिवारात गेला असता त्याला तेथे त्याच्या वडिलांचा मृतदेह अत्यंत छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला. याची माहिती त्याने लगेचच घनसावंगी पोलिसांना दिली. माहिती मिळताच घनसावंगी ठाण्याचे निरीक्षक बाळासाहेब पवार, उपनिरीक्षक जे.बी.पुरी, जमादार जी.जी. मदन हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तातडीने खुन्याचा माग काढण्यासाठी श्वानपथकाला पाचारण केले. मात्र, त्याचा उपयोग झालेला नाही. मयत अंकुश गायकवाड यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रांजणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला. या घटनने परिसरात खळबळ उडाली आहे. ही हत्या नेमकी कोणत्या कारणास्तव झाली, याचा अद्याप शोध लागला नसून, या प्रकरणी घनसावंगी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जे.बी. पुरी हे करीत आहेत.

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिस