शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्त कार्यालयाकडून पालिकेची झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 00:48 IST

जालना पालिकेतील गेल्या पाच वर्षांत झालेल्या विविध विकास कामांची चौकशी करण्यासाठीची तक्रार करण्यात आली होती. ही तक्रार मुख्यमंत्री कार्यालयाकडे करण्यात आल्याने त्यांच्या कार्यालयाकडून आयुक्तांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना पालिकेतील गेल्या पाच वर्षांत झालेल्या विविध विकास कामांची चौकशी करण्यासाठीची तक्रार करण्यात आली होती. ही तक्रार मुख्यमंत्री कार्यालयाकडे करण्यात आल्याने त्यांच्या कार्यालयाकडून आयुक्तांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दुपारी पाच अधिकाऱ्यांचे पथक दाखल झाले होते. यावेळी चौकशी समितीकडे अनेकांनी आपल्याला येणा-या अडचणीं संदर्भातील निवेदनही सादर केले आहे.जालना पािलकेत काँग्रेसची सत्ता असल्याने युतीकडून हे चौकशीचे राजकारण करून पालिकेला बदनाम करण्याचे उद्योग सुरू असल्याचा गंभीर आरोप नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी आठवडाभपूर्वीच पत्रकार परिषदेत केला होता. परंतु आता मुख्यमंत्री कार्यालयाकडूनच ही चौकशी प्रस्तावित करण्यात आल्याने ती करण्या शिवाय प्रशासनासमोर गत्यंतर नाही. शुक्रवारी औरंगाबाद येथील अप्पर आयुक्त शिवानंद टाकसाळे, विभागीय प्रादेशिक संचालक अ‍ॅलिस पोरे, लेखाधिकारी वैजनाथ शेळके, जीवन प्राधिकरणचे अभियंता डी. डी. मालेकर आणि लेखाधिकारी संजय धीवर यांचा या चौकशी समितीत सहभाग आहे.यावेळी समितीने पालिकेतील त्यांना हवे असलेले रेकॉर्ड मागवून घेतले होते. यावेळी बंदव्दार चौकशी दरम्यान मुख्याधिकारी नितिन नार्वेकर, अतिरिक्त मुख्याधिकारी केशव कानपुडे तसेच विविध विभागांचे खाते प्रमुख उपस्थित होते. दरम्यान यावेळी समिती जालन्यात दाखल झाल्याची माहिती मिळताच अनेक नागरिकांनी त्या समितीची भेट घेऊन निवेदन दिल्याचे सांगण्यात आले. त्यात पालिका फंडातून करण्यात आलेल्या दोन कोटींच्या रस्ते कामाची चौकशी करण्याची मागणी नगरसेविका संध्या देठे यांनी निवेदनाव्दारे केली. तर ए.आर. पाटील यांनी देखील निवेदन दिले आहे. गणेश विसर्जन करतांना मोती तलावात बुडून मृत्यू झालेल्या मुलाच्या परिवारानेही समितीची भेट घेऊन निवेदन दिले.अंदाज समितीनंतर दुसरी चौकशीतीन वर्षांपूर्वी अंदाज समितीचे तत्कालीन अध्यक्ष राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी पालिकेला भेट देऊन चौकशीचे निर्देश दिले होते. त्यानुसार याची चौकशीही झाली; परंतु त्या चौकशीत नेमका कोणावर ठपका ठेवला या बाबतचा अहवाल अद्यापही जनतेसमोर आला नाही.दबक्या आवाजात अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर या अंदाज समितीने ठपका ठेवल्याचे बोलले जात आहे; परंतु तो अहवाल जनतेसाठी खुला करून जनेतलाही दूध का दूध आणि पाणी..का पाणी.. समोर आले पाहजे अशी मागणीही यावेळी करण्यात आली. दरम्यान यावेळी शिवसंग्राम संघटनेनेही आपल्या मागण्यांचे निवेदन समितीला सादर केले आहे.

टॅग्स :Divisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालयJalana Muncipalityजालना नगरपरिषद