शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
4
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
5
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
6
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
7
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
9
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
10
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
11
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
12
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
13
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
14
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
15
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
16
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
17
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
19
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
20
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?

मसापच्या अध्यक्षपदी भुतेकर, तर तडेगावकर सचिव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 00:44 IST

मराठवाडा सहित्य परिषद जालना शाखेच्या कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षपदी उपप्राचार्य प्रा. रमेश भुतेकर यांची निवड झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मराठवाडा सहित्य परिषद जालना शाखेच्या कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षपदी उपप्राचार्य प्रा. रमेश भुतेकर, सचिवपदी पंडितराव तडेगावकर, उपाध्यक्षपदी प्रा. जयराम खेडेकर तर कोषाध्यक्षपदी कैलास भाले यांची निवड झाली आहे.सर्वानुमते कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली. सूचक व अनुमोदक म्हणून जेष्ठ साहित्यिक किशोर घोरपडे, राजेंद्र राख, डॉ. सुधाकर जाधव, राम सावंत, अ‍ॅड. विनायक चिटणीस, हरिहर शिंदे यांनी काम पाहिले. जालना शाखेने प्रथमच बिनविरोध निवड करून एक नवा पायंडा मराठवाड्यात पाडल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.जालना शहर हे साहित्यिक व सांस्कृतीक क्षेत्रास पाठबळ देणारे असून, पदाच्या माध्यमातून जालना शहरात म.सा.प. ला नवी उभारी देण्यासह साहित्यिक उपक्रम व साहित्यिकांना दर्जेदार कार्यक्रमांची मेजवानी मिळावी, यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असे अध्यक्ष प्रा. रमेश भुतेकर यांनी सांगितले. सर्वांना सोबत घेवून साहित्य व संस्कृतीच्या संवर्धनासाठी नूतन कार्यकारिणी प्रयत्नशील राहिल, असेही ते म्हणाले. प्रा. रंगनाथ खेडेकर यांनी सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले. यावेळी रेखा बैजल, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, प्रा. रावसाहेब ढवळे, प्रा. बसवराज कोरे, राम गायकवाड, गणेश राऊत, अब्दुल हफिज, प्र. स. हुसे, प्रा. गजानन जाधव, डॉ. संभाजी पाटील, डॉ. व्ही.वाय. कुलकर्णी, अ‍ॅड. मिसाळ, प्रा. विलास भुतेकर, प्रा. संदीप पाटील, डॉ. भगवानसिंह ढोबाळ, डॉ. जगन्नाथ खंडागळे, यशवंत सोनवने, प्रा. सुनंद तिडके, सुलभा कुलकर्णी, शकुंतला कदम, विमलताई आगलावे, विनीत साहणी, रमेश तवरावाला, एस.एन. कुलकर्णी, ज्योती धर्माधिकारी, अरूण सरदार यांच्यासह मराठवाडा साहित्य परिषदेचे जिल्ह्यातील सदस्य उपस्थित होते. नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

टॅग्स :literatureसाहित्यElectionनिवडणूक