शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

जनावरांसाठी पाणी आणण्यास गेलेल्या मायलेकाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

By विजय मुंडे  | Updated: March 26, 2024 18:56 IST

ऐन धूलिवंदन सणादिवशीच मायलेकाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

जालना : जनावरांसाठी शेततळ्यातून पाणी काढताना पाय घसरून शेततळ्यात पडल्याने मायलेकाचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना कडवंची (ता. जालना) शिवारात सोमवारी दुपारी ऐन धूलिवंदनाच्या दिवशी घडली.

सुमित्रा माणिकराव वानखेडे (वय ४०), समाधान माणिकराव वानखेडे (वय २२, रा. कडवंचीवाडी ता. जालना) अशी मयतांची नावे आहेत. कडवंची गावांतर्गत कडवंचीवाडी येथील सुमित्रा माणिकराव वानखेडे आणि त्यांचा मुलगा समाधान माणिकराव वानखेडे हे दोघे सोमवारी दुपारी शेतात गेले होते. वीजपुरवठा खंडित असल्याने जनावरांसाठी ते शेततळ्यातून पाणी काढत होते. परंतु, अचानक आतमध्ये पडल्याने बुडून दोघांचा मृत्यू झाला. ते शेततळ्यात पडल्यानंतर काही वेळाने त्यांचा लहान मुलगा तेथे आला. त्याने ही घटना काका विनायक वानखेडे यांना सांगितले. यानंतर विनायक वानखेडे व परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांना शेततळ्याच्या बाहेर काढून जालना येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. ऐन धूलिवंदन सणादिवशीच मायलेकाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

कष्टातून फुलविली हाेती शेतीवानखेडे कुटुंबीय तीन एकर शेतात वेगवेगळे प्रयोग करून उदरनिर्वाह करीत होते. यामध्ये सुमित्रा वानखेडे या सर्वतोपरी मदत करीत होत्या. त्यांनी कष्टातून शेती फुलविली होती. शेतात कष्ट करणाऱ्या सुमित्रा वानखेडे व त्यांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

दोन दिवसांपासून वीजपुरवठा बंदवानखेडे यांच्या शेतशिवारातील वीजपुरवठा दोन दिवसांपासून बंद होता. त्यामुळे जनावरांना पाणी पाजण्यासाठी शेततळ्याचा आधार घ्यावा लागला. शेततळ्यातून पाणी काढत असताना ही दुर्दैवी घटना घडल्याचे नातेवाइकांनी सांगितले.

टॅग्स :JalanaजालनाDeathमृत्यू