शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

अनैतिक संबधात अडसर ठरल्याने आईनेच केली मुलाची हत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 17:24 IST

यश रमेश मगरे असे मृत मुलाचे नाव असून याप्रकरणी पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे. 

जालना : अनैतिक संबधात अडसर ठरत असल्याने प्रियकराच्या मदतीने आईनेच आपल्या आठ वर्षाच्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना भोकरदन तालुक्यातील दावतपूर येथे उघडकीस आली. यश रमेश मगरे असे मृत मुलाचे नाव असून याप्रकरणी पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे. 

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, यश मगरे हा सोमवारी दुपारपासून गायब होता. नातेवाईकांनी दिवसभर त्याचा शोध घेतला. परंतु, यश सापडला नाही यामुळे रात्री उशीरा भोकरदन पोलीस ठाण्यात याची तक्रार देण्यात आली. आज सकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल जायभाये यांनी या प्रकरणी दावतपूरला भेट देत चौकशी सुरु केली. 

काही माहितीच्या आधारावर त्यांनी अविनाश जयकिरण मगरे (१९) याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली. यावेळी अविनाश याने सोमवारी दत्ता साहेबराव घायवट व समाधान बाबूराव घायवट यांच्या मदतीने यशची हत्या केल्याचे कबुल केले. सोमवारी हत्या केल्यानंतर त्यांनी यशचा मृतदेह शेतातील एका झुडपात ठेवला. त्यानंतर सकाळी त्यांनी यशचा मृतदेह विहिरीत टाकला. दरम्यान, आतापर्यंत यशच्या आई विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नाही. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय अधिकारी सुनिल जायभाये,  पोनि. दशरथ चौधरी, पोलीस कर्मचारी गणेश पायघन, शेख आसेफ, रामेश्वर शिनकर यांनी भेट दिली.

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारीJalanaजालना