शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात 'नकोशी'ला झुडपात टाकून माता फरार; मागील १५ महिन्यात आढळले १२ अर्भक

By विजय मुंडे  | Updated: April 5, 2024 17:02 IST

या प्रकरणात अज्ञात पालकांविरूद्ध कदीम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जालना : एका पाच दिवसांच्या स्त्री जातीच्या अर्भकाला झुडपात टाकून एक माता फरार झाली. ही घटना बुधवारी ३ एप्रिल रोजी दुपारी ४:५० वाजण्याच्या सुमारास समोर आली असून, त्या अर्भकावर जिल्हा स्त्री रूग्णालयात उपचार केले जात आहेत. या प्रकरणात अज्ञात पालकांविरूद्ध कदीम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जालना शहरातील रेल्वे स्टेशन भागातील श्रीराम मंदिर परिसरातील झुडपात बुधवारी दुपारी एक बाळ रडत असल्याचा आवाज नागरिकांना आला. नागरिकांनी पाहिले असता एक स्त्री जातीचे अर्भक आढळून आले. त्यानंतर तात्काळ ११२ क्रमांकावर संपर्क साधून माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच कदीम पोलिस ठाण्याचे पोहकॉ. आशपाक दादामिया शहा, बीट अंमलदार पोना. पिराणे, चाईल्ड लाईनचे संतोष दाभाडे व इतरांनी नागरिकांच्या मदतीने त्या बालिकेला जिल्हा स्त्री रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्या बाळाच्या पायावर व शरिरावर जखमा होत्या. शिवाय प्रकृती अत्यावस्थ असल्याने अतिदक्षता विभागात ठेवून उपचार करण्यात आले. त्या बालिकेला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले जाणार आहे. या प्रकरणात पोहेकॉ. आशपाक शहा यांच्या तक्रारीवरून कदीम पोलिस ठाण्यात अज्ञात पालकांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१५ महिन्यात आढळले १२ अर्भकमागील १५ महिन्यात जिल्ह्यात १२ अर्भकं रस्त्यावर फेकून दिल्याचे समोर आले आहे. मागील वर्षभरात ८ तर चालू वर्षात ४ अर्भकं आढळली आहेत. त्यात स्त्री जातीचे ७ तर पुरूष जातीचे ५ अर्भक आढळले आहेत. संबंधित प्रकरणात गुन्हेही दाखल झाले आहेत.

मागील १५ महिन्यात १२ अर्भक आढळले आहेत. त्या बालकांवर उपचार करून पुढील काळजी संरक्षणासाठी छत्रपती संभाजी नगर येथील शिशुगृहात दाखल गेले आहे. कोठे अर्भक आढळून आले तर नागरिकांनी बाल कल्याण समितीकडे संपर्क करावे.- एकनाथ राऊत, अध्यक्षबालकल्याण समिती जालना

टॅग्स :JalanaजालनाCrime Newsगुन्हेगारी