शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मोसंबी जालन्यात, प्रक्रिया केंद्र पैठणमध्ये; फलोत्पादन मंत्र्यांनी साधली संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2021 17:53 IST

मोसंबीचे आगार जालना जिल्ह्यात असतांना सिस्ट्रेस इस्टेट केंद्र हे पैठणला हलविले आहे. याला कुठल्याच नेत्यांनी आक्षेप घेतला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

- संजय देशमुखजालना : पूर्वीपासूनच मोसंंबीचे आगार म्हणून जालना जिल्ह्याची मराठवाड्यात ओळख आहे. तसेच या मोसंबीस जीआय नामांकनही जालन्यातील शेतकऱ्यांनी मिळवले असतांना केवळ फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी राजकीय ताकद वापरून हे सिस्ट्रस इस्टेट केंद्र पैठण येथे हलविल्याने जिल्ह्यातील मोसंबी उत्पादकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

संपूर्ण मराठवाड्याचा विचार केल्यास सर्वात जास्त मोसंबी उत्पादक शेतकरी हे जालना जिल्ह्यात असून, मराठवाड्यात मोसंबीचे एकूण क्षेत्र हे जवळपास चाळीस हजार हेक्टर आहे. पैकी २९ हजार ५२५ हेक्टर क्षेत्र हे एकट्या जालना जिल्ह्यात आहे. त्यातच जालन्यातील शेतकऱ्यांनी जीआय नामांकनही प्राप्त केले असून, बदनापूर येथे मोसंबी संशोधन केंद्रही आहे. त्यामुळे हे सिस्ट्रस केंद्र जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील मोसंबी संशोधन केंद्रात झाले असते तर, त्याचा अधिकचा उपयोग झाला असता, असा सूर शेतकरी खासगीत व्यक्त करत आहेत.

पैठण तालुक्यात केवळ उत्तरेला पाच ते सात हजार हेक्टरवर मोसंबीची लागवड केली आहे. त्या तुलनेत जालना जिल्हा हा अग्रेसर आहे. या पैठण येथील सिस्टस केंद्रात उच्च दर्जाची रोपवाटिका तयार करणे, उच्च दर्जाचे कलम करून ते शेतकऱ्यांना देणे तसेच ग्रेडिंग, पॅकेजिंगची सुविधा होणार असून, मोसंबीची निर्यात वाढीला चालना देण्याचा उद्देश केंद्राचा आहे. त्यासाठी ३६ कोटी रुपयांचा निधी देखील १५ डिसेंबरला मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

राजकीय नेत्यांचे सोयीस्कर दुर्लक्षमोसंबीचे आगार जालना जिल्ह्यात असतांना सिस्ट्रेस इस्टेट केंद्र हे पैठणला हलविले आहे. याला कुठल्याच नेत्यांनी आक्षेप घेतला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हे केंद्र पैठण येथे होत असल्याने केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दुर्लक्ष केले आहे, कारण पैठण हा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघात मोडतो. शिवसेनेचे नेतेही गप्प आहे, कारण संदीपान भुमरे हे शिवसेनेचे मंत्री असून, ते जालना जिल्ह्यातील सर्वच नेत्यांचे जवळचे मित्र आहेत. तर, दुसरीकडे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि आ. कैलास गोरंट्याल यांनी देखील ही बाब पाहिजे तेवढी गंभीरतेने घेतली नाही.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीJalanaजालना