शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक कैदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 00:09 IST

राज्यातील तुरुंगांमध्ये सध्या २५ हजार कैदी असून, ही संख्या ७५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून ही संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती राज्याचे विशेष पोलीस कारागृह महानिरीक्षक डॉ. विठ्ठल जाधव यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्यातील तुरुंगांमध्ये सध्या २५ हजार कैदी असून, ही संख्या ७५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून ही संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती राज्याचे विशेष पोलीस कारागृह महानिरीक्षक डॉ. विठ्ठल जाधव यांनी दिली. येथील जिल्हा कारागृहात गुरुवारी कैद्यांसाठी आयोजित विशेष प्रवचन कार्यक्रमात ते बोलत होते.या वेळी ह.भ.प. दिनकर पाठक, कारागृह अधीक्षक धनसिंग कवाळे, तुरुंगाधिकारी एस. बी. निर्मळ, आनंद टेंगले, हिदायत तांबोळी आदींची प्रमुख उपस्थिती होती. महानिरीक्षक डॉ. जाधव म्हणाले, की कारागृहांमध्ये अधिक असलेली कैद्यांची संख्या कमी करण्यासाठी वागणुकीत सुधारणा होत असलेल्या कैद्यांच्या शिक्षेचा कालावधी कमी करणे, जामिनावर सोडणे इ. प्रक्रिया राबवली जात आहे.तसेच उपलब्ध कारागृहांमधील कक्षांची संख्या वाढविण्याबरोबर मुंबई आणि पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे नवीन कारागृह उभारण्याचा प्रस्तावित आहे. राज्यभरातल्या कारागृहांमध्ये कीर्तन, प्रवचन यासारखे उपक्रम घेतले प्राधान्याने राबविले जात आहेत. यातून अनेक कैद्यांच्या वागणुकीत सुधारणा होत आहे. या वेळी डॉ. जाधव यांनी संपूर्ण कारागृहाच्या परिसरात फिरून तपासणी केली. कैद्यांना दिले जाणारे जेवण, वैद्यकीय सुविधा, जेवणाची भांडी याची डॉ. जाधव यांनी तपासणी केली.जिल्हा कारागृहाचे काम चांगलेजालना जिल्हा कारागृहाची इमारत सुसज्ज असून, येथे कैद्यांना चांगल्या सुविधा दिल्या जात आहेत. शिवाय सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, मोबाईल जॅमर बसविण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.