शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

पैशांचा पाऊस पाडणाऱ्या भोंदूबाबाच्या बतावणीत आणखी बडे मासे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2021 16:43 IST

हिवरखेडा येथून उपजीविका भागविण्यासाठी किसन पवार हा पुणे येथे दोन ते तीन वर्षांपूर्वी गेला होता. तेथे त्याने आपण मांत्रिक असल्याचे सांगून अनेकांना भुलविले.

ठळक मुद्देबनावट नोटांच्या वापराने पितळ उघडे

जालना : विशेष पूजा करून आपण पैशांचा पाऊस पाडतो, अशी बतावणी करून पुण्यातील एका व्यापाऱ्याला चक्क ५२ लाख रुपयांना लुबाडले. याप्रकरणी मंठा तालुक्यातील हिवरखेडा येथील संशयित भोंदूबाबा किसन पवार याला पुणे पोलिसांनी २ जूनला अटक केली. त्याचा तपास सध्या सुरू असून, या भामट्याने आणखी जवळपास सात ते आठ नागरिकांना असेच लुबाडल्याचे स्पष्ट झाले आहे.

हिवरखेडा येथून उपजीविका भागविण्यासाठी किसन पवार हा पुणे येथे दोन ते तीन वर्षांपूर्वी गेला होता. तेथे त्याने आपण मांत्रिक असल्याचे सांगून अनेकांना भुलविले. त्याच्या या बतावणीला अनेक बडे व्यापारी आणि शिक्षित नागरिकही बळी पडले. पुण्यातील एका व्यापाऱ्यास विशेष पूजा केल्यास पैशांचा पाऊस पाडतो, असे सांगून त्याची दिशाभूल केली. या भोंदूबाबाच्या थापेला हा व्यापारी बळी पडल्याने त्याचे ५२ लाख रुपयांचे नुकसान झाले. ही बाब कळताच सदरील व्यापाऱ्याने पोलीस ठाणे गाठले होते. पुणे येथील स्थानिक गुन्हे शाखेकडे हा तपास आल्याने पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे तसेच सहायक पोलीस निरीक्षक अमृता चौरे यांच्याकडे आल्यावर त्यांनी हिवरखेडा गाठून संशयित किसन पवारला अटक केली.

या घटनेला आता आठवडा लोटला आहे.या भोंदूबाबाच्या तपासाबद्दल चौरे यांना विचारले असता, त्या म्हणाल्या की, पुण्याप्रमाणेच आसपासच्या अनेक गावांत पवार याने सात ते आठ श्रीमतांना गंडा घातल्याचे दिसून येत आहे. तपासात त्याच्याकडून ज्यांची नावे आणि पत्ते मिळाले आहेत, तेथे आम्ही जाऊन आलो. तेथेही या भाेंदूबाबाने पैशाचा पाऊस पाडण्यासह गुप्तधनाची लालूच दाखविली. आम्ही सध्या या बाबींचा तपास करत असल्याने नेमके कोणाकडे गेलो, कोणकोण त्याच्या जाळ्यात अडकले आहेत. हे आताच जाहीर करू शकत नसल्याचे चौरे यांनी सांगितले.

बनावट नोटांच्या वापराने पितळ उघडेआपण विशेष पूजा करून पैशांचा पाऊस पाडतो, अशी बतावणी करत, हिवरखेडा येथील किसन पवार याने पैशांचा पाऊस एका व्यापाऱ्याच्या घरात पाडला देखील; परंंतु त्या पावसासाठी वापरलेल्या नोटा या बनावट असल्याचे व्यापाऱ्यांच्या नंतर लक्षात आले. त्या आधी पवार याने संबंधित व्यापाऱ्याकडून ५२ लाख रुपये उकळले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालना