लोकमत न्यूज नेटवर्कआन्वा : भोकरदन तालुक्यातील आन्वा येथे दोन महिन्यांपासून पाणी टंचाई आहे. टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्याची मागणी करुनही याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने बुधवारी संतप्त महिलांनी मोर्चा काढून टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्याची मागणी सरपंचाकडे केली.उन्हाची तीव्रवा चांगलीच वाढल्याने पाण्याची मागणी वाढली आहे. गावातील सार्वजनिक विहिरीमध्ये पंधरा ते विस दिवसाआड टँकरव्दारे पाणी टाकण्यात येते. मात्र पुरेशे पाणी नसल्याने ग्रामस्थांचे दोन महिन्यापासून पाण्याविना हाल होत आहे. विहिरीत टाकलेले पाणी लगेच संपत असल्याने ग्रामस्थांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. यामुळे महिलांना यामुळे प्रत्येक वार्डात चार दिवसाआड टँकरव्दारे पाणी पुरवठा करण्याची मागणी महिलांनी केली आहे.गावातील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. मात्र प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे अद्यापही गावातील पाणी प्रश्न न सुटल्याने महिला जाम चिडल्या होत्या.
आन्वा ग्रामपंचायत कार्यालयावर पाण्यासाठी मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 00:36 IST