शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

पासपोर्ट कार्यालयात महिन्याभराची वेटिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 01:21 IST

वर्षभरापूर्वीच सुरु झालेल्या जालना येथील पासपोर्ट कार्यालयाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दिवसभरात ४० ते ४५ जणांच्या कागदपत्राची पडताळणी केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : वर्षभरापूर्वीच सुरु झालेल्या जालना येथील पासपोर्ट कार्यालयाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दिवसभरात ४० ते ४५ जणांच्या कागदपत्राची पडताळणी केली जात आहे. यामुळे जालनेकरांना दिलासा मिळाला आहे. संबंधितांना आता नागपुरच्या वाऱ्या बंद झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.परराष्ट्र मंत्रालय व डाक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने २६ मार्च २०१८ पासून जालना येथे पासपोर्ट कार्यालयाचे कामकाज सुरु झाले आहे. प्रारंभीपासून अर्जदारांची संख्या वाढली आहे. जालना कार्यालयात पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना जवळसपास एक ते दीड महिना वेटिंगवर राहावे लागत आहे. केवळ तीन कर्मचाºयावर सुरु असलेल्या या कार्यालयात दररोज ४० ते ४५ जणांच्या अर्जाची पडताळणी केली जात आहे. एक वर्षाच्या कालावधीत जवळपास ९ हजार अर्ज आले असून येथील बहुतांश अर्जाची पडताळणी झाली आहे.जालना येथे कार्यालय सुरु व्हावे, यासाठी नागरिक, व्यापा-यांनी मागणी केली होती. २६ मार्च पासून सुरु झालेल्या या कार्यालयात तातडीने सुविधा मिळत असल्याने अर्जदारांची सोय झाली आहे. यापूर्वी जालन्याच्या नागरिकांना नागपूर येथे जावे लागत होते. सध्या हजयात्रा, शासकीय कर्मचारी, तसेच उन्हाळी सुट्या, आणि परदेशात शिक्षणासाठी जाणाºयांचे अर्ज अधिक आहे. या शिवाय जालन्यात कार्यालय झाल्यामुळे अनेकजण पासपोर्ट काढून घेत आहेत. नवीन असलेल्या कार्यालयात व्यवस्थापक म्हणून पी. आर. मोरे तर त्यांना सहायक म्हणून एन.जी. तोडकर ए ए. शेळके हे काम पाहत आहेत. मोरे हे परराष्ट्र मंत्रालयाकडून जालना कार्यालयात प्रमुख आहेत. तर स्थानिक पोस्ट कार्यालयातून दोन कर्मचारी नियुक्त केले आहेत. दररोज ४० जणांच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी आमंत्रिक केले जाते. त्यामुळे दिलेल्या वेळेत काम होत असल्याने अर्जदारही समाधान व्यक्त करत आहेत.परदेशात नोकरी, व्यवसाय किंवा पर्यटनासाठी जाणाºया नागरिकांना पासपोर्ट काढायला पूर्वी बाहेरच्या जिल्ह्यात जावे लागत असल्याने वेळ, आणि पैशा अधिक खर्च करावा लागत होता. आता जालन्यात कार्यालय झाल्याने चांगली सोय झाली आहे.दरम्यान जालना येथील पासपोर्ट कार्यालयाचे व्यवस्थापक पी. आर मोरे म्हणाले. २६ मार्च कामकाज सुरु झाले आहे. दररोज किमान ४० ते ४५ जण पडताळणीसाठी येत आहे. या सुविधेमुळे नागरिक, विद्यार्थ्यांची गैरसोय दूर झाल्याचे नागरिक सांगत आहेत.

टॅग्स :passportपासपोर्टTravel Tipsट्रॅव्हल टिप्स