शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

मोगरा, गुलाब बहरला पण भाव पडला; निराश शेतकऱ्यांनी रस्त्यावर अन् गटारात फेकली फुले

By विजय मुंडे  | Updated: April 1, 2023 12:14 IST

परतूर तालुक्यातील चिंचोली व परिसरातील शेतकरी गत काही वर्षापासून फुलशेती करीत आहेत.

जालना : मागील दोन महिन्यांपासून मोगरा, गुलाबासह इतर फुलांना बाजारपेठेत किलोमागे पाच-दहा रूपयांचा दर मिळत आहे. कमी दरामुळे उत्पादन खर्चही हाती पडत नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी शुक्रवारी परतूर (जि.जालना) येथील मुख्य रस्त्यावर, गटारीत ही फुलं फेकून संताप व्यक्त केला.

परतूर तालुक्यातील चिंचोली व परिसरातील शेतकरी गत काही वर्षापासून फुलशेती करीत आहेत. या भागात गुलाब, निशिंगध, मोगरा, काकडा यासह इतर फुलांचे उत्पादन घेतले जाते. फुलांच्या बागेची लागवड असो किंवा वर्षीराचा खर्च असो तो अधिक प्रमाणात करावा लागतो. बागेत रोगराई होवू नये म्हणून आठवड्यातून दोन वेळेस फुलांवर फवारणी करावी लागते. शिवाय फुलांच्या ताेडणीसाठी मजुरांवर होणारा खर्च, माल बाजारपेठेत नेण्यासाठी होणारा खर्च हा वेगळाच आहे. परंतु, गत काही महिन्यांपासून संभाजीनगर येथील बाजारपेठेत फुलांपाच पाच ते २० रूपये किलाेचा भाव मिळत आहे. सद्यस्थितीत तर हा दर पाच- दहा रूपयांवर आला आहे. त्यामुळे वाहतूक खर्चही शेतकऱ्यांच्या हाती पडत नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी शेतातून तोडलेली फुले बाजारपेठेत न नेता परतूर येथील मुख्य रस्त्यावर, गटारीत फेकून संताप व्यक्त केला. शेतकरी ही फुलं फेकत असल्याचे पाहून उपस्थित नागरिकांची मनेही हेलावून गेली होती.

हाती काहीच उत्पन्न नाही मी पाच वर्षापासून फुलशेती करीत आहे. फुलशेती करताना शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागतो. बाजारपेठेत चांगले दर मिळाले तरच चार पैसे हातात पडतात. परंतु, गत काही महिन्यांपासून दर खालावले असून, आमच्या हाती काहीच उत्पन्न पडत नाही.- डिगांबर कातारे, चिंचोली

बाजरात माल आणणे देखील परवडत नाही फुलशेतीला आठवड्यातून एक वेळेस फवारणी करावी लागते. मशागतीसह खत व इतर बाबींवर होणारा खर्च अधिक आहे. शिवाय माल बाजारपेठेत नेण्यासाठी चार रूपये किलोने पैसे द्यावे लागतात. परंतु, घसरलेले दर पाहता माल बाजारात पाठविणेही परवडत नाही.- भागवत चव्हाण, चिंचोली

बाजारपेठेतील किलोच्या दराची स्थितीफुलाचा प्रकार- पूर्वीचे दर- आताचे दरगुलाबाला ३० ते १५०- ५ ते १०निशिंगधला ४० ते २००- २० ते ३०मोगरा २०० ते २५०- ३० ते ४०काकडा १०० ते २००- ३० ते ४०गलांडा २० ते २५- ५ ते १०

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीJalanaजालना