गजानन देशमुख , पिंपळगाव रेणु.भोकरदन तहसीलमध्ये बोगस प्रमाणपत्रांचा सुळसुळाट निर्माण झाला असून तहसीलदारांच्या स्वाक्षरीने चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र काढण्यात आले असून त्यावर मोदी यांचा व्यवसाय मजुरी दर्शविण्यात आला आहे.सर्वसामान्यांना प्रमाणपत्र मिळविण्यासाठी या कार्यालयाच्या अनेक चकरा माराव्या लागतात. तरीही बघू, पाहू अशी उत्तरे देऊन प्रमाणपत्रे देण्यास टाळाटाळ केली जाते. २९ सप्टेंबर २०१४ या तारखेत नरेंद्र दामोधरदास मोदी (रा. भोकरदन) यांनी प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्याचे तसेच तलाठी सज्जा भोकरदन यांच्या अहवालानुसार मोदी यांच्या नावाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र मंजूर करण्यात आले. यात मोदी यांचे वार्षिक उत्पन्न २५ हजार रुपये दाखविण्यात आले. या प्रमाणपत्रातील कहर म्हणजे ‘हे प्रमाणपत्र राजकीय या कारणासाठी देण्यात येत आहे, अर्जदाराने दिलेली माहिती असत्य आढळल्यास हे प्रमाणपत्र रद्द करण्यात येईल’ असेही या प्रमाणपत्रावर नमूद करण्यात आले आहे.
चक्क मोदींना मजूर म्हणून प्रमाणपत्र !
By admin | Updated: October 9, 2014 12:29 IST