शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री संजय सिरसाट-मनोज जरांगे यांच्या भेटीने चर्चेला उधाण; दोघांनी सांगितलं महत्वाचे कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 15:19 IST

सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाट यांनी आज दुपारी मनोज जरांगे यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांना जात पडताळणीसाठी येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या

- पवन पवारवडीगोद्री ( जालना) : सामाजिक न्यायमंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय सिरसाट यांनी आज, सोमवारी ( दि. १६ ) दुपारी अंतरवाली सराटीमध्ये जाऊन मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांची भेट घेतली. या भेटीत दोघांमध्ये महत्वाच्या विषयावार चर्चा झाली. दोघांनीही याबाबत प्रसारमाध्यमांना माहिती दिली. मात्र, अचानक झालेल्या या भेटीने चर्चेला उधाण आले आहे.

मंत्री संजय सिरसाट यांच्या भेटी नंतर जरांगे म्हणाले की, गुवाहाटी येथील आयआयटी कॉलेजला लागलेल्या एका विद्यार्थ्यासह अनेक विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र मिळत नसून अधिकाऱ्यांकडून अडवणूक केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे मंत्री संजय सिरसाट यांना या अडचणी दूर कराव्यात अशी विनंती केली. तसेच यावेळी मराठा आरक्षण संदर्भातही चर्चा झाली. आम्ही राज्यातील प्रत्येक आमदार खासदार, मंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांना अंतरवाली सराटी येथे बोलावणार आहोत. मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय येणाऱ्या ३० जूनच्या अधिवेशनात मार्गी काढा अशी आमची मागणी आहे. यावेळी जे खासदार, आमदार, मंत्री आले ते आपले, जे नाही आलेत त्यावरून मराठा समाजाला कळलं कोण आपल अन् कोण परके. 

.. तर समाज ठरवेल, जरांगेंचा इशारा३० जून ला जर मराठा आरक्षण प्रश्न मार्गी नाही काढला तर आढमूठ कोण सरकार की मराठे हे सिद्ध होणार. त्यानंतर २९ ऑगस्टला मुंबईला जाऊन धडकणार, त्यानंतर मागे फिरणार नाही. परिणाम काय होईल,  आम्हाला माहीत नाही. काल सत्ताधारी अन् विरोधकांचे दहा ते पंधरा आमदार येऊन गेले. आम्ही त्यांना सांगितल, २९ जून ला अंतरवाली सराटीत राज्यव्यापी बैठक आहे. त्यात सांगणार की, आम्ही एवढ्या आमदार खासदार मंत्री यांना फोन केले, त्यातील एवढे आलेत. त्यानंतर समाज बघेल काय करायचं ते, असा इशारा जरांगे यांनी दिला. 

मंत्री शिरसाट-जरांगेंच्या भेटीचे अनेक अर्थविद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून त्यांना जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी अडचण येत असल्यामुळे जरांगे यांनी तक्रार केली होती त्या अनुषंगाने आपण जरांगे यांच्या भेटीसाठी आल्याच संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. दरम्यान, जात पडताळणी प्रमाणपत्र तात्काळ उपलब्ध व्हावेत. यासाठी आपण प्रधान सचिवांना तातडीने आदेश निर्गमित करण्याची सूचना केल्याचे मंत्री सिरसाट यांनी सांगितले आहे. दरम्यान, जात पडताळणी प्रमाणपत्राच्या अडचणीसाठी भेट झाली असल्याचे सांगण्यात येत असले तरी मागील काळात अनेक आरोपानंतर मंत्री शिरसाट यांनी जरांगे यांची भेट घेतल्याने अनेक अर्थ निघत असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलSanjay Shirsatसंजय शिरसाटMaratha Reservationमराठा आरक्षण