शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

वक्फ बोर्डाच्या जागेचा कोट्यवधींंचा घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 00:37 IST

भूखंड घोटाळ्यामुळे २२ वर्षापूर्वी जालना संपूर्ण राज्यात गाजले होते. त्यावेळी या भूखंड घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीश फाटक यांची नियुक्ती केली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : भूखंड घोटाळ्यामुळे २२ वर्षापूर्वी जालना संपूर्ण राज्यात गाजले होते. त्यावेळी या भूखंड घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीश फाटक यांची नियुक्ती केली होती. यात शहरातील खुल्या जागेसह वक्फबोर्डाच्या जागांचाही त्यात समावेश होता. त्यावेळी न्यायाधीश फाटक यांनी सदर अहवाल राज्य सरकारला सादर केला होता. मात्र, नंतर त्यातील दोषींवर थोड्याफार प्रमाणात कायदेशीर कारवाई होऊन हे प्रकरण थंड बस्त्यात पडले होते. मात्र, आज खुद्द वक्फबोर्डच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी तीन जणांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.या प्रकरणात राजा बाग शेर-सवार दर्गाचा मौलाना असल्याचे दाखवत सैय्यद जमिल सैय्यद जानिमिया व त्यांच्या अन्य दोन सहकाऱ्यांनी जालन्यातील भोकरदन नाका परिसरातील वक्फ बोर्डाच्या मालिकीची असलेली १८ एकर १६ गुंठे जागेवर अनेकांना प्लॉट दिले तर काहींना निकष डावलून नोटरीच्या आधारे भूखंडांची विक्री तसेच काहींशी करार करून दिले. हे करार करतांना नियमांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत केला असून, हा भूखंड घोटाळ्याची किंमत ही कोहीशे कोटींमध्ये जाते. हा गुन्हा दाखल झाल्याने जालना पुन्हा एकदा भूखंड घोटाळ्याच्या रडावर आले आहे.या प्रकरणी सोमवारी रात्री उशीरा सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सय्यद जमिल ,सय्यद जानीमिया (मौलाना), शेख वहीवोद्दीन शेख फकरोद्दीन, मोहम्मद मुसा मोहम्मद वाहेद अशा तीन संशयितांविरूध्द वक्फ बोर्डासह खरेदीदारांची फसणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांनी जालना शहरातील भोकरदन नाका परिसरात असलेल्या दर्ग्याच्या मुतावलीच्या नावे बनावट कागदपत्राआधारे मौलाना असल्याचे दाखविले. या प्रकरणात अजीज अहेमद सिरसाज अहेमद (सहायक मुख्य कार्यकारी अधिकारी, वक्फ बोर्ड, औरंगाबाद) यांच्या फिर्यार्दीवरुन हा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास उपविभागीय अधिकारी सुधीर खिरडकर हे करीत आहेत.भूखंड घेणारे अडचणीत, प्रशासनासमोर चौकशीचे आव्हानजालना-औरंगाबाद मार्गावरील अत्यंत मोक्याच्या ठिकाणी हे सर्व व्यवहार झाले आहेत. अनेकांनी पदरमोड करून ही जागा खरेदी केली आहे. परंतु आता ही तक्रार दाखल झाल्याने जागा खरेदीदारांचे धाबे दणाणले आहेत. भविष्यात काही निर्णय झाल्यास आमचे काय होणार अशी चिंता आतापासूनच आम्हाला सतावत असल्याने या परिसरातील व्यापाºयांनी नाव प्रसिध्द न करण्याच्या अटीवर सांगितले. काही दंड आकारून तो संबंधित विक्रीदारांकडून वसूल करून आम्हाला न्याय मिळाला पाहिजे असेही अनेकांनी बोलून दाखवले. शहरातील अनेक भागांमध्येही अशा प्रकारच्या वक्फ जमिनीचे घोटाळे गाजले आहेत.

टॅग्स :fraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीJalna Policeजालना पोलीस