शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

कंपनीचीच समृद्धी... तब्बल ३७९ कोटी रुपयांच्या मुरुमाचे अवैध उत्खनन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2021 14:15 IST

समृद्धी महामार्ग : जालन्यात ३७९ कोटी रुपयांच्या मुरुमाचे अवैध उत्खनन

ठळक मुद्देएकूण ७०० किलोमीटरचा हा महामार्ग १४ जिल्ह्यांना जोडला जात आहे. जालना तालुक्यातील नाव्हा ते बदनापूर तालुक्यातील गेवराई बाजार असा ४२ किलोमीटर हा महामार्ग जालना जिल्ह्यातून जात आहे.

संजय देशमुख जालना : मुंबई आणि नागपूर या शहरांना जोडणाऱ्या बहुचर्चित समृद्धी महामार्गाचा ४२ किलोमीटरचा पल्ला जालना जिल्ह्यातील २५ गावांमधून जातो. या महामार्गाचे काम सुरू असताना गेल्या अडीच वर्षांत बदनापूर तसेच जालना तालुक्यातून ३७९ कोटीच्या मुरुमाचे अवैध उत्खनन केल्याचे दिसून येते. महामार्गाजवळील डोंगर आणि खदानीतून हे उत्खनन केल्याचे पुढे आले आहे.

एकूण ७०० किलोमीटरचा हा महामार्ग १४ जिल्ह्यांना जोडला जात आहे. जालना तालुक्यातील नाव्हा ते बदनापूर तालुक्यातील गेवराई बाजार असा ४२ किलोमीटर हा महामार्ग जालना जिल्ह्यातून जात आहे. या महामार्गाचे काम गुजरातमधील मॉन्टे कार्लो कंपनीला देण्यात आले असून, ते एक हजार ३०० कोटी रुपयांचे आहे. त्यातील ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. हा रस्ता आठ पदरी असून तो पूर्णपणे सिमेंटचा आहे, यासाठी भराव टाकण्यासाठी मुरुमाचा मोठा वापर करण्यात आला. हा मुरुम कंपनीने त्यांना मंजूर केलेल्या क्षमतेपेक्षा अधिकचा उत्खनन केल्याची तक्रार बदनापूरचे शिवसेनेचे माजी आ. संतोष सांबरे यांनी केली होती. त्या तक्रारीची दखल घेत तत्कालीन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी समिती स्थापन केली होती. त्या समितीने प्रत्यक्ष उत्खनन केलेल्या जागेची पाहणी केली.

तसेच इटीएस या अत्याधुनिक तंत्राच्या मदतीने तपासणी केली. त्यात मोठ्या प्रमाणावर या मॉन्टे कार्लो कंपनीने अवैध उत्खनन केल्याचे दिसून आले. त्यामुळे २०२० मध्ये त्यांना पहिली नोटीस १६७ कोटी रुपये तसेच दुसरी नोटीस ७९ कोटी आणि तिसरी नोटीस ही जवळपास ८० कोटींची देण्यात आल्याची माहिती जालन्याचे तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी दिली. बदनापूर तहसीलदारांनी देखील खादगाव आणि अकोला येथील अवैध उत्खनन प्रकरणी नोटीस बजावून बुडविलेला गौण खनिजचा कर भरावा, असे सांगितले होते. परंतु कंपनीने या जिल्हा प्रशासनाच्या नोटिसीला औरंगाबादेतील उच्च न्यायालयात आव्हान दिले होते; मात्र उच्च न्यायालयाने गुरुवारी कंपनीची याचिका फेटाळून लावल्याने रस्ते बांधकाम करणाऱ्या कंपनीला मोठा झटका बसला आहे.

टॅग्स :JalanaजालनाSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग