शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

भाव घसरल्याने जालन्यातील दूध उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 14:03 IST

शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी दुधाचा व्यवसाय करतात. परंतु, दिवसेंदिवस घसरत चाललेल्या दुधाच्या दरामुळे जिल्ह्यातील शेतकरी अर्थिक संकटात सापडला आहे.  

जालना : शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी दुधाचा व्यवसाय करतात. परंतु, दिवसेंदिवस घसरत चाललेल्या दुधाच्या दरामुळे जिल्ह्यातील शेतकरी अर्थिक संकटात सापडला आहे.  अनेक शेतकऱ्यांचा प्रपंच दुधावर चालतो. परंतु, गायीची देखभाल करणे, चारा उपलब्ध करणे, याचा खर्च वसूल होत नसल्याने ते अडचणीत सापडले आहे. 

सध्या उन्हाळा सुरू असून, पाण्याची टंचाई भासत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी शेतात पिके न घेता गायींसाठी चाऱ्यांची लागवड करून  चार ते पाच गायींचा सांभाळ करतात. त्यामुळे घरखर्च व गायींना लागणाऱ्या चाऱ्यांचा खर्च निघत होता.  परंतु, अनेक महिन्यापासून दूध १५ ते २० रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. त्यामुळे गायींना लागणारा खुराक, दवाखाना, औषधी, ढेप, कडबा, ऊसाचा खर्च यातून वसूल होत नाही. परिणामी दूध उत्पादक शेतकरी अर्थिक संकटात सापडला आहे. हे दूध ३० ते ३५ रुपये प्रतिलिटर दराने खरेदी केले तर दूध उत्पादक शेतकरी कर्जमुक्त होईल, अन्यथा कर्जबाजारी व्हायला वेळ लागणार नाही. सरकारने दुधाचे भाव वाढवावे, अशी मागणी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.

मागणी वाढली : दुधाचे पदार्थ महागलेदुधाचे भाव कमी झाले असले तरी दुधापासून तयार करण्यात आलेल्या पदार्थाच्या वाढलेल्या किंमती मात्र, कमी झालेल्या नाही. श्रीखंड, दही, ताक, पनीर,  बर्फी यांच्या किमंती दूधा पेक्षा अधिक आहे. त्यामुळे यांच्याही किंमती कमी करण्यात याव्यात, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.

गायींच्या किंमती घसरल्याने नुकसान

मी दररोज २५ ते ३० लिटर दूध विकतो. मला हे दूध मोटार सायकलवरून घेऊन जावे लागते. दुधाचे भाव चांगले होते. तेव्हा मला काही अडचण नव्हती. पण दुधाचे भाव घसल्याने मी अर्थिक संकटात सापडलो आहे.- रामेश्वर आर्दड,दूध उत्पादक शेतकरी

माझ्याकडे पाच गायी आहे. त्यांना दररोज सहाशे ते सतशे रुपयांचा चारा लागतो. परंतु, दुधाचे भाव घसरल्याने हा चारा विकत घेण्यासाठीच पैसे उरत नाही. त्यामुळे सरकारने दुधाचे भाव तातडीने वाढवावेत. - रामभाऊ पवळ, दुध उत्पादक शेतकरी

टॅग्स :milkदूधFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र