शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

जालना जिल्ह्यात दुग्ध व्यवसायाला सुगीचे दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 23:41 IST

गत वर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातील शासकीय दूध संकलन प्रतिदिन पाच हजार लिटरने वाढले आहे.

बाबासाहेब म्हस्के/जालना : जिल्ह्यातील दूध उत्पादन वाढविण्यासाठी दुग्धविकास विकास विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. याचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून, गत वर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातील शासकीय दूध संकलन प्रतिदिन पाच हजार लिटरने वाढले आहे.जिल्ह्यात सध्या ५५ शासकीय संस्थांच्या माध्यमातून साडेदहा हजार लिटर तर समर्थ तालुका दूध संघाच्या माध्यमातून साडेपाच हजार लिटर दूध संकलन केले जाते. गतवर्षीच्या तुुलनेत यात सरासरी पाच हजार लिटरने वाढ झाली आहे. जिल्ह्यातील दूध उत्पादन वाढविण्यासाठी दुग्धविकास विभागाकडून वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत. विशेषत: सुशिक्षित बेरोजगारांना या व्यवसायाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देऊन प्रोत्साहित केले जात आहे. यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील नाणीबाई चिखली येथे आतापर्यंत दीडशेहून अधिक बेरोजगारांना तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अंबड तालुक्यातील अनेक युवकांनी मुक्त संचार गोठा पद्धतीने गायींचे पालन करून दूध निर्यातीस सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील शासकीय दूध खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून होणा-या दूध संकलनास याचा फायदा झाला आहे. सध्या शासनाकडून गाईच्या दुधाला प्रतिलिटर २७ रुपये, तर म्हशीच्या दुधाला प्रतिलिटर ३६ रुपयांचा दर दिला जात आहे. महिनाभरात एक कोटी ३० लाख, ५० हजारांचे दूध संकलन केले जात असून, दूध विक्रीचे पैसे दर दहा दिवसांनंतर पशुपालकाच्या बँक खात्यावर थेट जमा केले जात आहेत.-------शीतकरण केंद्र पूर्ण क्षमतेने कार्यान्वितयेथील जुन्या औद्योगिक वसाहतीमध्ये उभारण्यात आलेले शासकीय दूध संकलन व शीतकरण केंद्र आता पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाले आहे. जिल्हाभरातून संकलित केल्या जाणा-या दुधावर या ठिकाणी आवश्यक प्रक्रिया करून हे दूध पुणे, वणी येथे पाठवले जात आहे.............दुधाळ जनावरे वाटपासाठी बैठकजालना : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या विशेष घटक योजनेंतर्गत वर्ष २०१७-१८ साठी दुधाळ जनावरांचे गट वाटप व शेळी गट वाटप योजनेच्या लाभधारकांच्या निवडीसाठी निवड समितीची बैठक बुधवारी दहा वाजता जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आली आहे. सर्व लाभधारकांनी बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या सभापतींसह पशुसंवर्धन व कृषी अधिका-यांनी केले आहे.-------------जिल्ह्यातील दूध संकलनात गती वर्षीच्या तुलनेत पाच हजार लिटरने वाढ झाली आहे. अनेक होतकरू तरुण दुग्धोत्पादनाकडे वळत असून, त्यांना आवश्यक प्रशिक्षण देऊन सहकार्य केले जात आहे.- एल. एम. प्रधान, सहायक दुग्धविकास अधिकारी, जालना.