शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दुधना काळेगावात युवकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 00:21 IST

शेतात झोपण्यासाठी गेलेल्या एका युवकाचा कु-हाडीने वार करून खून केल्याची घटना तालुक्यातील दुधना कोळेगाव येथे गुरूवारी सकाळी उघडकीस आली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना / गोलापांगरी : शेतात झोपण्यासाठी गेलेल्या एका युवकाचा कु-हाडीने वार करून खून केल्याची घटना तालुक्यातील दुधना कोळेगाव येथे गुरूवारी सकाळी उघडकीस आली. अमोल नारायण म्हस्के (वय २५) असे मयताचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.जालना तालुक्यातील दुधना काळेगाव येथील शेतकरी अमोल म्हस्के याने शेतात कपाशीची लागवड केली आहे. परंतु, वन्य प्राणी रात्रीच्यावेळी या पिकाचे नुकसान करतात. त्यामुळे अमोल बुधवारी रात्री ११ वाजता शेत राखण्यासाठी गेला होता. सकाळी साडेसहा वाजता शेजारचे कैलास म्हस्के हे शेतात गेले होते. अमोल आणखी का उठला नाही म्हणून त्यांनी त्याला आवाज दिला. परंतु, त्याने प्रतिसाद न दिल्याने ते त्याला बघण्यासाठी गेले. त्यावेळी अमोल रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.दरम्यान, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी खिरडकर यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर घटनास्थळी श्वान पथकाला पाचरण करण्यात आले होते.घटनास्थळावरुन पोलिसांनी काही वस्तू जप्त केल्या आहेत. हा खून शेतीच्या वादातून झाल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी खिरडकर यांनी सांगितले.तीन महिन्यांपूर्वीच झाला होता विवाहअमोलला दोन भाऊ आहेत. एक आपेगाव येथे महाराज आहे. तर दुसरा गावातच शेती करतो. अमोलचे अलीकडेच २९ मार्च रोजी लग्न झाले होते. सामनगाव येथील त्याची पत्नी आहे. दरम्यान, अमोलचे वडील पांडुरंगांच्या वारीला पंढरपूर येथे गेले होते.रात्री व्हॉटस्अप स्टेटस केले अपलोडशेतातील गोठ्यापासून जवळच असलेल्या शेतात अमोलने बाज टाकली होती. रात्री १२ वाजून १९ मिनिटांनी त्याने त्याचे व्हॉटस्अ‍ॅप स्टेटस अपलोड केले होते.

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारी