शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मुहूर्त साधण्यासाठी व्यापारी, ग्राहक सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 00:47 IST

साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेला सोने तसेच वाहन आणि रिअल इस्टेट अर्थात घरखरेदीला महत्व दिले जाते. विशेष करून सोने खरेदीला या दिवशी मोठे महत्त्व आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेला सोने तसेच वाहन आणि रिअल इस्टेट अर्थात घरखरेदीला महत्व दिले जाते. विशेष करून सोने खरेदीला या दिवशी मोठे महत्त्व आहे.ही बाब लक्षात घेऊन सराफा बाजारातील व्यापाऱ्यांशी संपर्क साधला. सध्या दुष्काळी स्थिती असल्याने पूर्वी प्रमाणे मोठ्या प्रमाणावर खरेदी होणार नसली तरी, अनेकांनी मुहूर्त हातचा जाऊ नये म्हणून, पाच ग्रॅम पासून एक ग्रॅम पर्यंतची बुकींग केली असल्याची माहिती भरत ज्वेलर्सचे संचालक भरत जैन यांनी दिली. वाहन बाजारात तेजीचे वातावरण दिसून आले. दुचाकी आणि चारचाकी वाहन बाजारात अक्षयतृतीयेला मोठ्या प्रमाणावर खेरदी अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले.गेल्या काही महिन्यांपासून रिअल इस्टेट क्षेत्रात मंदीचे वातावरण होते, ते आता दूर होईल असे सांगण्यात आले. दोन महिन्यांपूर्वी गृहखरेदीच्या कर्जावरील व्याजदर कमी केले आहेत, त्यामुळे अक्षयतृतीयेच्या दिवशी चांगली बुकींग होईल अशी आशा बांधकाम व्यावसायिक धीरेंद्र मेहरा यांनी सांगितले. एकूणच अक्षयतृतीयेपासून शेतीच्या कामांना मोठ्या प्रमाणावर प्रारंभ करण्यात येतो. काही भागात धूळ पेरणी केली जाते. जालना जिल्ह्यात ही धूळ पेरणी भोकरदन तालुक्यात केली जात असल्याचे कृषी विभागातील सूत्रांनी सांगितले.बाजारपेठ : वाहतुकीत बदल गरजेचाअक्षय तृतीया असल्याने मंगळवारी सराफा तसेच अन्य दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी होणार आहे. ही गर्दी लक्षात घेता मुख्य बाजारपेठेत दुचाकी आणि चारचाकी वाहने घेऊन जाण्यास मज्जाव करावा. जेणे करून वाहतुकीचा होणारा खोळंबा टाळता येणे शक्य होणार आहे.सोन्याचे दर स्थिरगुढी पाडव्यानंतर सोन्याच्या दरात वाढ होईल अशी अपेक्षा होती. परंतु यंदा हे दरात थोडाबहुत चढ-उतार सोडल्यास जास्त भडकले नाहीत. अक्षयतृतीच्या पूर्वसंध्येला प्रतितोळे दर हे ३१ हजार ८०० रूपये अधिक तीन टक्के जीएसटी असे होते.- भरत जैन, सराफा व्यापारी

टॅग्स :Akshaya Tritiyaअक्षय तृतीयाMarketबाजारjewelleryदागिने