शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अनेकांना राहावे लागले मतदानापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 01:18 IST

काही मतदारांचे मतदार यादीत नाव नसल्यामुळे त्यांना मतदानापासून वंचित रहावे लागले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना लोकसभा मतदार संघात मंगळवारी मतदान पार पडले. सकाळपासून जालनेकरांनी मतदानासाठी हजेरी लावली होती. उन्हामुळे अनेक बुथवर नागरिकांनी सकाळीच मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. परंतु, काही मतदारांचे मतदार यादीत नाव नसल्यामुळे त्यांना मतदानापासून वंचित रहावे लागले.मतदार यादीतील गोंधळ या निवडणुकीतही कायमच होता. काहींची नावे गहाळ होती. तर अनेकांचे मतदान केंद्रच बदर्लले होते. जालना शहरातील सेंट मेरी स्कूलमधील मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आलेले जनार्दन किसन आकुलकर व स.भु येथील बुथवर सीताबाई गोविंदावर सातपुते यांच्याकडे मतदान ओळखपत्र असतानाही त्यांचे यादीत नाव आले नाही. त्यामुळे त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागले.लोकसभेची निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली होती. मतदारांना विविध सुविधा मतदान केंद्रावर देण्यात आल्या होत्या. महिला मतदारांसाठी आयोगाने सखी मतदान केंद्राची स्थापना केली होती, तर दिव्यांगासाठी विविध सुविधाही देण्यात आल्या होत्या. परंतु, याद्यात मोठ्या प्रमाणात गोंधळ पाहायला मिळाला.जालना लोकसभा मतदार संघातील काही बुथवर नागरिकांना आपली नावे शोधण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. तर काहींकडे ओळखपत्र असतानाही त्यांचे यादीत नावे नसल्याने त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागले. तर अनेकांचे मतदान केंद्रही बदल्यामुळे त्यांना हेलपाटे मारावे लागले.मतदार यादीत तरुणांबरोबर वृध्दांची नावे नव्हती. यात काहींची आॅनलाईन पाहणी केल्यानंतर मिळाली. तर काहींची नावे सापडली नाहीत. त्यामुळे हेलपाटे मारावे लागले. अनेकांची नावे दोन दोन मतदान केंद्राच्या यादीत आढळून आल्याने देखील गोंधळाचे वातावरण होते.दुर्लक्ष : व्हीलचेअर नावापुरत्याच, काहींचे फोटोसेशनजालना : दिव्यांग मतदारांना सुविधा पुरविल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला. प्रत्यक्षात मात्र, काही बुथवर दिव्यांग व्यक्तींना कुठलीही सुविधा मिळाली नसल्याचे समोर आले. जालना शहरातील काही बुथची पाहाणी केली असता, दिव्यांगांना ये-जा करण्यासाठी व्हीलचेअर नसल्याचे समोर आले.जिल्ह्यातील मतदार संख्या लक्षात घेऊन निवडणूक विभागाने मतदान प्रक्रियेची तगडी तयारी केली होती. नोंदणी केलेल्या सर्व मतदारांना मतदानाचा हक्क कुठल्याही अडथळ््याविना बजावता यावा, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली होती.६ विधानसभा मतदार संघात २ हजार ०५८ मतदार केद्रांची सोय करण्यात आली होती. यातील ५ मतदान केंद्रे ही महिलांच्या हाती तर ५ दिव्यांगाच्या हाती होती. दरम्यान, जालना मतदार संघात ११ हजार ०७३ दिव्यांग मतदार आहे. दिव्यांगांना मतदान केंद्रावर ये- जा करण्यासाठी व्हीलचेअर मिळाली नाही.अनेक मतदान केंद्रावर दिव्यांग आणि वृद्धांसोबत आलेले मदतनीस देखील सेल्फी काढतांना दिसून आले.रूख्मिणीबाई हयातनगर या ९५ वर्षाच्या महिलेने वॉकरची मदत घेऊन मंगळवारी मतदान केले. सोबत डॉ. हयातनगरकर दाम्पत्य.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकjalna-pcजालनाVotingमतदान