शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

थर्टीफर्स्टला अनेकांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 00:37 IST

थर्टीफर्स्ट नाईटला रविवारी रात्री झिंगत घरी जाणा-यांची रात्री गुन्हे शाखेने कसून तपासणी केली

जालना : थर्टीफर्स्ट नाईटला रविवारी रात्री झिंगत घरी जाणा-यांची रात्री गुन्हे शाखेने कसून तपासणी केली. थेट ब्रेथ अ‍ॅनालायझर लावून अल्कोहोलचे शरीरातील प्रमाण तपासण्यात आले. यात बहुतांश तरुणांनी अधिक प्रमाणात अल्कोहोल घेतल्याचे आढळून आले.नववर्षाचे स्वागत जल्लोषात करण्यासाठी अनेकजण थर्टीफर्स्ट नाईटला पार्ट्यांचे बेत आखतात. जालना शहरातही रविवारी रात्री बहुतांश हॉटेल-ढाबे हाऊसफुल्ल होते. नववर्षाचे स्वागत करून रात्रीच्या वेळी नशेत भरधाव वाहन चालवत घरी जाताना अपघाताच्या घटनांचा पूर्वानुभव लक्षात घेता, पोलिसांनी रविवारी रात्री विशेष तपासणी मोहीम राबवली. शहरातील औरंगाबाद चौफुली, भोकरदन नाका, बसस्थानक, मामा चौक, गांधी चमन परिसरात दुचाकीवरून रात्री जाणा-यांची पोलिसांनी तपासणी केली. ठिकठिकाणी सुमारे चाळीस जणांची तपासणी करण्यात आली. यात बहुतांश तरुणांनी प्रमाणापेक्षा अधिक अल्कोहोल घेतल्याचे आढळून आले. तर काही जणांकडे वाहनाची कागदपत्रे व परवाना नसल्याने पोलिसांनी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. या प्रकरणी विशाल रमेश मिसाळ, सुदर्शन पाटीलबा भुंबर व अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, कृती दलाचे यशवंत जाधव, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सदर बाजार ठाण्याचे महादेव राऊत यांच्यासह कर्मचा-यांनी या कारवाईत सहभाग घेतला.