शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

चोरांनी पोलिसाचेच घर केले साफ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 00:06 IST

तालुक्यात चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घालत एकाच रात्री पाच गावांमध्ये घरफोड्या केल्या. एवढ्यावरच न थांबता एका पोलिसाचे घर फोडून तीन लाखांचा ऐवज लंपास केला

भोकरदन : तालुक्यात चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घालत एकाच रात्री पाच गावांमध्ये घरफोड्या केल्या. एवढ्यावरच न थांबता एका पोलिसाचे घर फोडून तीन लाखांचा ऐवज लंपास केला. बुधवारी मध्यरात्री सिपोरा बाजारसह अन्य चार गावांमध्ये हा प्रकार घडला.तालुक्यातील सिपोरा बाजार, आन्वा, जळगाव सपकाळ, वाकडी व पिंपळगाव रेणुकाई या पाच गावांमध्ये बुधवारी रात्री एक ते तीनच्या दरम्यान चोरट्यांनी पाच ठिकाणी घरफोड्या केल्या. वाकडी येथील सांडू शामजी दागे हे पत्नीसह मुंबईला रुग्णालयात गेले असता, चोरट्यांनी घराची कुलूप तोडून रोख रक्कम व दागिने चोरून नेले. दांडगे दाम्पत्य बाहेरगावी असल्यामुळे चोरीस गेलेली नेमकी रक्कम कळू शकली नाही. कोदोली येथे एका ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न झाला, तर पारध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळगाव रेणुकाई येथील विनायक कृषी सेवा केंद्राचे शटर उचकटून चोरट्यांनी किरकोळ साहित्य चोरून नेले. जळगाव सपकाळ येथील डॉ. नरेंद्र सपकाळ यांच्या दवाखान्यातील पाच हजारांचे साहित्य चोरट्यांनी लंपास केले. आन्वा येथील आजूबाई ज्वेलर्स या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी वीस हजारांचा मुद्देमाल लंपास केला, तर शिवाजी सिल्लोडे यांच्या घरातील पाच हजारांचे साहित्य ढापले.चोरीच्या घटनांबाबत माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर वसावे, निरीक्षक दशरथ चौधरी, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर साखळे, डी़जे़ शिंदे यांनी घटनास्थळांना भेटी दिल्या. औरंगाबाद येथील श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही.पोलिसाच्या घरावरही डल्लासिपोरा बाजार येथील पोलीस कर्मचारी साहेबराव कड हे कुटुंबियांसह बाहेरगावी गेले असता, घरात कुणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी मध्यरात्री घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. घरातील दोन लाख ६८ हजार रूपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने व रोख वीस हजार, असा एकूण २ लाख ८८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.दरम्यान गावातील एकाने चोरट्यांना दुचाकीवरून पळून जाताना पाहिले. या प्रकरणी दिलीप कड यांच्या तक्रारीवरून भोकरदन ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.