शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

अनेक कंपन्यांनी उत्पादनात केली कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 00:04 IST

मंदीचा फटका आता जालन्यातील उद्योगांनाही बसला आहे. आॅटोमोबाईलशी संदर्भातील जालन्यातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या एनआरबीने देखील आपल्या उत्पादनात मागणीअभावी कपात केली आहे.

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मंदीचा फटका आता जालन्यातील उद्योगांनाही बसला आहे. आॅटोमोबाईलशी संदर्भातील जालन्यातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या एनआरबीने देखील आपल्या उत्पादनात मागणीअभावी कपात केली आहे. तसेच रात्रीची तिसरी शिप्ट जवळपास बंद केली आहे. याचा परिणाम म्हणून हंगामी कामगारांवर -कॅज्युअल गंडांतर आले आहे. एकूणच २००८ मध्ये मंदी होती, परंतु ती एवढ्या मोठ्या प्रमाणावर नसल्याचे सूत्रांनी सांगितले.जालन्यातील एनआरबी कंपनीला जालन्यातील उद्योग विश्वात मानाचे स्थान आहे. साधारणपणे १८८१ पासून ही कंपनी अविरत सुरू आहे. वाहनांसाठी लागणारे वेगवेगळ्या आकाराचे बेरींग्ज येथे तयार होतात. जवळपास एक हजार कामगारांना यामुळे रोजगार मिळाला आहे. परंतु सध्या देशातील आॅटोमाबईल क्षेत्रात आलेली मंदी ही मोठी असल्याचे सांगण्यात आले. वाहन उद्योगातील अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी आपले उत्पादन लक्षणीयरित्या घटविल्याने आम्हालाही उत्पादन कमी केल्या शिवाय पर्याय नसल्याचे कंपनीतील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता सांगण्यात आले. या कंपनीचे बेरींग्ज हे देशासह परदेशातील अनेक बड्या वाहनांमध्ये वापरले जातात. साधारपणे एका वाहनात आठ ते दहा बेरींग्जचा उपयोग होतो. परंतु आता ही मागणी कमी झाल्याने हंगामी कामगारांना कमी करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतल्याचे सांगण्यात आले.स्टील उद्योगातील मंदीचे सावट अद्याप हटलेले नाही. गेल्या चार महिन्यांपासून स्टीलच्या दरात कपातीचा मोठा फटका उद्योजकांना बसलेला आहे.एकीकडे पावसाने देखील पाठ फिरवल्याने स्टीलची मागणी घटली आहे. आता नवरात्रा नंतर यात काही अंशी बदल होईल अशी अपेक्षा उद्योजक ठेवून आहेत. आॅटोमोबाईलशी संदर्भातील दुसरी एक मोठी कंपनी म्हणजेच एल.जी. बालकृष्ण ही असून, या कंपनीतील दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी लागणा-या चैनचे उत्पादन केले जाते. त्या संदर्भात सीटू औरंगाबाद मजदूर युनियनचे ज्येष्ठ कामगार नेते उध्दव भवलकर यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, मंदीचा कहर आहे, परंतु तो सध्या जालन्यातील बालकृष्ण कंपनीला अद्यापतरी बसलेला नाही. सध्या त्यांच्याकडे जुन्या आॅर्डर असल्याने उत्पादन जैसे थे असल्याचे भवलकर म्हणाले.आॅर्डर तयार परंतु पैसे थकलेजालन्यातील लघुउद्योगातील अनेक उद्योजकांना देशासह परदेशातून वस्तू निर्मितीच्या आॅर्डर आहेत. त्यानुसार डिझाईन करून उत्पादन तयारही केले आहे. परंतु हे उत्पादन तयार आहे, तुम्ही पैसे देऊन घेऊन जा असा संपर्क वारंवार आॅर्डर देणाऱ्यांकडे करूनही त्यांच्याकडून आता पूर्वी सारखा प्रतिसाद मिळत नाही.त्यामुळे आमची लाखो रूपयांची गुंतवणूक रखडली असून, दिलेल्या आॅर्डर आता कधी डीलेव्हर होतात. याकडेच लक्ष लागून असल्याचे उद्योजकांनी सांगितले.

टॅग्स :MIDCएमआयडीसीEconomyअर्थव्यवस्थाAutomobile Industryवाहन उद्योग