शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

मनोज जरांगे यांची तब्येत खालावली; खाजगी डॉक्टरांकडून अंतरवाली सराटीत उपचार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 19:28 IST

अंतरवाली सराटी येथे घरीच उपचार सुरू; अशक्तपणामुळे सलाईन लावण्यात आले असून प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती

- पवन पवार वडीगोद्री ( जालना) : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावल्याने अंतरवाली सराटी येथे घरीच त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. जरांगे यांना आज दुपारी चार वाजेच्या दरम्यान अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर तत्काळ खाजगी डॉक्टरांना बोलविण्यात आले. त्यानंतर जरांगे यांना अशक्तपणामुळे सलाईन लावण्यात आले असून प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे मागील वर्षभरापासून विविध आंदोलने, उपोषण करत आहेत. काही दिवसांपूर्वी आरक्षणासाठी त्यांनी पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केले होते. आतापर्यंतचे उपोषणाची त्यांची पाचवी वेळ होती. पाचव्या टप्प्यातील उपोषणास चवथ्या दिवशी स्थगिती दिल्यानंतर मनोज जरांगे छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी हॉस्पीटल येथे उपचारास दाखल झाले. प्रकृती ठीक झाल्यानंतर जरांगे दि २७ जुलै रोजी रुग्णालयातून सुटी घेऊन अंतरवाली सराटीत आले. तेव्हापासून जरांगे यांच्या आगामी रणनीतीवर बैठका सुरू आहेत. तसेच अनेक मान्यवर त्यांच्या भेटीस येत असतात.

दरम्यान, आज दुपारी ४ वाजता अचानक मनोज जरांगे यांना अशक्तपणा वाटून घबराट जाणवली. तत्काळ डॉक्टरांनी भेट देत जरांगे यांची तपासणी केली. अंतरवाली सराटीचे सरपंच यांच्या शेतातील घरी जरांगे यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. त्यांना सलाईन लावण्यात आली असून प्रकृती स्थिर आहे. जरांगे यांचे ब्लडप्रेशर देखील कमी झाल्याची माहिती खाजगी डॉक्टरांनी दिली. 

ओबीसी नेते हरिभाऊ राठोड अंतरवाली सराटीतओबीसी नेते हरिभाऊ राठोड हे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला अंतरवाली सराटीत आले आहेत. जरांगे यांची प्रकृती खालवल्याने त्यांना सलाईन लावण्यात आली होती. सलाईन संपल्यानंतर दोघांमध्ये सध्या संवाद सुरू झाला. आरक्षण या विषयावरच त्यांची चर्चा सुरू आहे.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालना