शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

'तुमचा कार्यक्रम लावायला मला वेळ लागणार नाही', मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 16:18 IST

राज्यभरात वाळू माफियांविरोधात प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. यात जरांगे पाटलांच्या मेहुण्याचाही समावेश आहे.

पवन पवार/ वडीगोद्री(जालना)- राज्यभरात वाळू माफियांविरोधात प्रशासनाने मोठी कारवाई सुरू केली आहे. काल जालना जिल्ह्यातील नऊ जणांविरोधात प्रशासनाने तडीपीरीची कारवाई केली, यात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मेहुणा विलास खेडकर याचाही समावेश आहे. या कारवाईनंतर जरांगे पाटलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. 'मला कितीही एकटा पाडायचा प्रयत्न करा, मी आता थांबत नसतो. मी आरक्षण मागतो, म्हणून माझे पाहुणेरावळे सापडतात का?' असा सवाल जरांगे पाटलांनी केला.

...तर तुमचा कार्यक्रम लावणार

का? अंबड उपविभागीय न्याय दंडाधिकारी यांच्या आदेशाने तडीपारीची कारवाई शनिवारी रात्री करण्यात आली. याबाबत  माध्यमांना प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, 'मी पाहुणारावळा मानत नाही, पूर्ण राज्य माझा पाहुणा आहे. मराठा आंदोलकांना नोटीसा द्यायच्या, पाहुणेरावळ्यांच्या नावाखाली माझे तोंड बंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मी आरक्षण मागतो म्हणून माझे पाहुणेरावळे सापडतात का? फडणवीस साहेब, तुम्ही जर मराठ्यांना वेठीस धरायचे काम केले तर, तुमचा कार्यक्रम लावायला मला वेळ लागणार नाही,' असा घणाघात जरांगे पाटलांनी केला.

...तुमच्यावर गद्दारीचा शिक्का

जरांगे पाटील पुढे म्हणतात, प्रामाणिक आंदोलकांना तुम्ही विकत घेऊ शकत नाही. त्यांच्यावर तुम्ही प्रेशर आणू शकत नाही. मराठ्यांनी सांगावे आणि फडणवीसांनी करावे, अशी आमची भोळीभाबडी इच्छा होती. बेईमानी आणि गद्दारी या शब्दांचा शिक्का तुमच्यावर पडू देऊ नका. आम्ही भोळे लोक आहोत, त्यामुळे सढळ हाताने तुम्हाला मदत केली. तुम्ही रंडकुंडीला आला होता, ही गादी कधीच मिळू शकत नव्हती. या राज्यात मराठ्यांशिवाय पान हालू शकत नाही. तुमचे भागले म्हणून तु्म्ही उलटणार असला, तर हे तुमच्यासाठी घातक ठरेल. चूक सुधाराा आणि दिलेल्या नोटीसा मागे घ्या. आम्ही तुम्हाला सन्मानाची वागणूक द्यायला तयार आहोत. नाहीतर पुढच्या काळात सन्मान हा शब्द डोक्यातून काढून टाकायचा.' 

देवेंद्र फडणवीसांचे षडयंत्र 

'आपण स्पष्ट सांगितले आहे. तुमचे बाकीचे काय माहिती नाही, आपण त्यात पडतही नाही. पण मराठा आंदोलक म्हणून जर तुम्ही त्यांना नोटीसा देणार असला, हे तुमच्यासाठी घातक आहे. बाकीचे तुमचे काही असेल तर मला देणेघेणे नाही. तुम्ही आंदोलक म्हणून त्यांना नोटीस दिल्यात हे ध्यानात ठेवा. सरकारने माझे तोंड बंद करण्यासाठी मुद्दाम माझ्या पाहुण्यारावळ्याचे नाव तडीपारीच्या यादीत घुसवले असावे. हे 100 टक्के देवेंद्र फडणवीसांचे षडयंत्र आहे. देवेंद्र फडणवीसला माहीत नाही की, मी समाजापुढे आई-बापाला सुद्धा जवळ केले नाही. महाराष्ट्रातील सहा कोटी मराठे माझे पाहुणे आहेत. आमच्या स्वभावाचा फायदा उचलायचा नाही. देवेंद्र फडणवीस, तुम्ही जर मराठ्यांना त्रास दिला, तर तुमचा कार्यक्रम लावायला मला वेळ लागणार नाही,' असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी दिला. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaratha Reservationमराठा आरक्षण