टेंभुर्णी : ग्रामस्थांनी भाजपाला निर्विवाद बहुमत देत ग्रामपंचायत ताब्यात दिली. आता निवडून आलेल्या भाजपाच्या सर्व १० सदस्यांनी आगामी पाच वर्षे जनहिताची कामे करून जनतेचा विश्वास सार्थ करावा, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य तथा ग्रामरक्षक पॅनलचे प्रमुख शालीकराम म्हस्के यांनी केले.
टेंभुर्णी येथे भाजपाच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी म्हस्के बोलत होते. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार संतोष दानवे यांच्या माध्यमातून टेंभुर्णी व परिसरात झालेल्या विकासात्मक कामाला जनतेने दिलेला हा कौल आहे. ग्रामस्थांसाठी पाणीप्रश्न हा गंभीर बनला असून, तो सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाहीही म्हस्के यांनी दिली. यावेळी माधवराव अंधारे, माजी उपसरपंच इंद्रराज जैस्वाल, फैसल चाऊस, गणेश धनवई, राजू खोत, उद्धव दुनगहू, भिकनखा पठाण, शरद गायमुखे, प्रदीप भोपळे, रंजीत जाधव, शेख मुश्ताक, गौतम म्हस्के, संजय राऊत, शिवाजी मुळे, अनिल वरगणे, सुरेश सोळंके, ज्ञानेश्वर उखर्डे, अलकेश सोमानी, ऋषीकेश पैठणकर, दत्तू मुनेमानिक, विलास कुमकर, शेख सैफ, दत्ता सोनसाळे, सूर्यप्रकाश मघाडे, लहू मघाडे, कपील जाधव, अमोल देशमुख, सचिन मुगुटराव, नितीन शिंदे, मुरली कुमकर यांच्यासह सदस्य ग्रामस्थांची उपस्थिती होती.
फोटो कॅप्शन : टेंभुर्णी येथे भाजपाच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करताना जिल्हा परिषद सदस्य शालीकराम म्हस्के व इतर.