शिवरायांना अभिवादन
मंठा : शिवजयंतीनिमित्त येथील शिवसेना कार्यालयात प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख ए.जे. बोराडे, संतोष वरकड, प्रल्हाद बोराडे, नगराध्यक्ष नितीन राठोड आदींची उपस्थिती होती.
कारवाईची मागणी
जालना : शहरासह ग्रामीण भागात अवैधरीत्या दारूविक्री जोमात सुरू आहे. तळीरामांमुळे भांडणतंट्यात वाढ होत असून, महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने दारूविक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
वीजग्राहकांची गैरसोय
घनसावंगी : शहरासह ग्रामीण भागातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. खंडित वीजपुरवठ्यामुळे ग्राहकांना गैरसोयीचा सामना करावा लागत असून, सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.
देशमुख यांना पुरस्कार
वरूड बु. : पिंपळगाव रेणुकाई (ता. भोकरदन) येथील वसंतराव देशमुख यांना छत्रपती शिक्षण सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. जळकी बाजार येथे हा पुरस्कार वितरित करण्यात आला.