शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

सहायक लेखापाल निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 00:47 IST

जालना येथील वीज वितरण कंपनीच्या मस्तगड कार्यालयात अनोखा आणि चौकशी अधिकाऱ्यांनाही अचंबित करणार घोटाळा करण्यात आला आहे. या प्रकरणी मंगळवारी सहायक लेखापाल मायानंद अडचिने यांना निलंबित केले

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना येथील वीज वितरण कंपनीच्या मस्तगड कार्यालयात अनोखा आणि चौकशी अधिकाऱ्यांनाही अचंबित करणार घोटाळा करण्यात आला आहे. या घोटाळ्याची पाळमुळे शोधून काढताना चौकशी अधिकारी हैराण झाले आहेत. या प्रकरणी मंगळवारी सहायक लेखापाल मायानंद अडचिने यांना निलंबित केले असून, यापूर्वी वरिष्ठ लिपिक पंकज सरदेशपांडे यांना निलंबित केले आहे.जालना येथील वीज वितरण कंपनीतील अधिकारी आणि कर्मचा-यांनी संगणमत करून धनादेशाच्या माध्यमातून घोटाळ्याचे प्रकरण लोकमतने उघडकीस आणले होते. त्या नंतर या सर्व प्रकरणाची सखोल चौकशीचे आदेश मुख्य अभियंता शरद गणेशकर यांनी दिले आहेत. यात आऊटसोर्सीग एजंसीच्या माध्यमातून वीजबिल वसुली करताना जे धनादेश घेण्यात आले, ते वेळेत न भरता न वटलेल्या धनादेशाचा हिशोबही नीट न ठेवल्याचे दिसून आले. या प्रकरणी लोकमत मधून वृत्त प्रसिध्द होताच या प्रकरणाने वीज वितरणमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती. या प्रकरणात मंगळवारी सहायक लेखापाल अडचिने यांना निलंबित केले असून, प्रारंभी पंकज सरदेशपांडे यांना प्रथमदर्शनी दोषी आढळल्याने यापूर्वीच निंबित केल्याचे अधीक्षक अभियंता हुमणे म्हणाले.जालना शहराचा प्रभारी पदभार असलेल्या कनिष्ठ अभियंत्यावरही या घोटाळ्यात संशयाची सुई फिरत आहे. त्यामुळे सध्या औद्योगिक वसहातीचा पदभार असलेल्या एक कनिष्ठ अभियंता हे प्रकरण उघडकीस आल्यापासून फरारी असल्याचे सांगण्यात आले. संबंधित अभियंत्याच्या घरी चौकशी समितीचे सदस्य जाऊन आले असता, ते बाहेरगावी गेल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :mahavitaranमहावितरणsuspensionनिलंबनCorruptionभ्रष्टाचार