शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

जालना जिल्ह्यात महात्मा फुले जनआरोग्य योजनेत ३९ हजार रुग्णांवर झाले उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 15:38 IST

गोरगरीब रुग्णांसाठी ‘महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना’ ही जीवनदायी ठरली आहे.

ठळक मुद्देगेल्या साडेचार वर्षात या योजनेंतर्गत ३९ हजार ५५३ रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले आहे.

जालना : गोरगरीब रुग्णांसाठी ‘महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना’ ही जीवनदायी ठरली आहे. गेल्या साडेचार वर्षात या योजनेंतर्गत ३९ हजार ५५३ रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले आहे. त्यापोटी शासनाने ९५ कोटी ७६ लाख ७२ हजार १८३  रुपयांचा खर्च केला आहेत.

दारिद्रयेषेखाली जीवन जगणाऱ्या कुटुंबास आरोग्य सेवा मिळावी म्हणून शासनाच्यावतीने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरु करण्यात आली  होती. दरम्यान, या योजनेचे नाव बदलून महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना असे करण्यात आले. या योजनेतंर्गत ९७१ आजारांवर उपचार करण्यात येतात. यातील १३२ आजारांवर शासकिय रुग्णालयातच उपचार केले जाऊ शकते. 

या योजनेमुळे गोरगरीब दारिद्रयेरेषेखालील व अर्थिक मागासलेल्या  कुटुंबातील रुग्णांना दीड लाखांपर्यत मोफत उपचार करण्यात येतात. तसेच मूत्रपिंडावरील आजारावर अडीच लाखापर्यंत आरोग्य सेवा दिली जाते. या योजनेत जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयासह पाच रुग्णालय येतात. या योजनेमुळे अनेक रूग्णांना मोठा दिलासा मिळाला असून, हृदयरोगासह अन्य गंभीर आजारासाठी ही योजना गोरगरिबांसाठी संजीवनी ठरत आहे.अन्य जिल्ह्यांतही घेतले उपचार

जिल्ह्यातील ३९ हजार ५५३ रुणांपैकी १५ हजार ३७२ रुग्णांनी योजने अतंर्गत परजिल्ह्यात उपचार घेतले. यातील २४ हजार १८१ रुग्णांनी जिल्हयात उपचार घेतले. या योजनेमुळे अनेक गोर गरिबांचा फायदा झाला आहे. या योजनेसाठी रूग्णालयातच स्वतंत्र माहितीकक्षही स्थापन करण्यात आला आहे.  

टॅग्स :hospitalहॉस्पिटलmedicinesऔषधंState Governmentराज्य सरकार