शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

वसुलीच्या नावाखाली आठवडी बाजारात लूट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 00:58 IST

बाजारात पालिकेकडून कुठल्याही सुविधा दिल्या जात नसल्या तरी बाजार भाडेपट्टी वसुलीच्या नावाखाली विक्रेत्यांची लूट सुरू आहे. भाडेपट्टी वसुली करणाºया ठेकेदाराकडून अनेकदा पैसे घेऊन पावती दिली जात नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जुना जालन्यातील रेल्वेस्थानक रस्त्यावर रविवारी भरणाऱ्या बाजारात ग्रामीण भागातून शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजीपाला विक्रीसाठी आणतात. बाजारात पालिकेकडून कुठल्याही सुविधा दिल्या जात नसल्या तरी बाजार भाडेपट्टी वसुलीच्या नावाखाली विक्रेत्यांची लूट सुरू आहे. भाडेपट्टी वसुली करणाºया ठेकेदाराकडून अनेकदा पैसे घेऊन पावती दिली जात नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.जुना जालन्यातील गांधीचमन ते रेल्वेस्थानक रस्त्यावरील आठवडी बाजारात आजूबाजूच्या गावातील शेतकरी थेट ताजा भाजीपला विक्रीसाठी आणतात. शेतकरी योग्य दरात भाजीपाला देत असल्याने शहरातील नोकरदार वर्ग शेतक-यां कडून भाजीपाला खरेदीस प्राधान्य देतात. स्थानिक विक्रेतेही नेहमीच्या ठिकाणांऐजवी रविवारी बाजारात भाजीपाला विक्री करतात. सुमारे चारशेंवर विक्रेते या बाजारा भाजीपाला, किराणा, फळे व अन्य साहित्य विक्री करतात. अनेकदा स्थानिक विक्रेते शेतक-यासोबत जागेवरून वाद घालतात. मोक्याच्या जागी शेतक-यांना भाजीपाला विक्रीसाठी बसू दिले जात नाही. त्यामुळे शेतकरी जागा मिळेल तिथे बसतात. असे असतानाही नगरपालिकेच्यावतीने प्रत्येक विक्रेत्यांकडून ठेकेदारामार्फत तीस रुपये बाजार भाडेपट्टी वसुली केली जाते. ठेकेदामार्फत वसुलीसाठी बाजारात येणा-या कर्मचा-यांकडून बहुतांश शेतकरी विक्रेत्यांना कुठलीही पावती न देता तीस रुपये घेतले जातात. भाडेपट्टीची वसुली करणाºया विक्रेत्याचे नाव पावतीवर टाकले जात नाही. याबाबत विचारणा केल्यास वसुलीसाठी येणारे कर्मचारी दमदाटी करतात.उगाच वाद नको म्हणून ग्रामीण भागातले शेतकरी निमूटपणे पैसे देतात. हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू असल्याचे एका विक्रेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. लालबाग परिसरात बुधवारी भरणाºया आठवडी बाजारातही अशाच पद्धतीने लूट सुरू आहे.रेल्वेस्थानक रस्त्यावर भरणारा रविवार बाजार अनधिकृत असल्याचा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे. सुरुवातीला नगरपालिका क्रीडा संकुलात भरणारा हा बाजार अनधिकृत असल्याचे सांगत पालिका प्रशासनाने उठवून दिला होता. बाजार अनधिकृतरीत्या भरवला जात असेल तर मग ठेकेदारामार्फत भाडेपट्टी वसुली कशी केली जाते, अशा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Marketबाजारvegetableभाज्या