जालना : कोरोना महामारीत राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ समूहाने हाती घेतलेला ‘रक्ताचं नातं’ हा उपक्रम अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. या उपक्रमातून संकलित होणाऱ्या रक्तामुळे अनेकांचे प्राण वाचण्यास मदत होणार असल्याच्या प्रतिक्रिया अनेक मान्यवरांनी व्यक्त केल्या.
जालना शहरात ‘लोकमत’ समूह, रोटरॅक्ट क्लब ऑफ रेनबो, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या संयुक्त विद्यमाने रविवारी दोन ठिकाणी रक्तदान शिबिरे घेण्यात आली. शहरातील महेश भवनमध्ये आयोजित रक्तदान शिबिरात रोटरॅक्ट क्लब ऑफ रेनबोच्या पदाधिकारी, सदस्यांनी रक्तदान केले. यावेळी सचिव हर्ष मंत्री, अध्यक्ष रिद्धी करवा, हर्ष करवा, अनुराग लाहोटी, मनीष बोरा, परेशीत जैस्वाल, वैष्णव लोया, अनुज बाहेती, ऋतूज रुणवाल, लोकेश ओस्तवाल, शशांक जैन, सिद्धार्थ धोका, ध्रुव अग्रवाल, जान्हवी अग्रवाल, श्रुती मंत्री, ममता अग्रवाल, निकिता दायमा, चतुर्थी मिराजकर, सृष्टी भावसर, मधुमिता उगले, वंशिका उबले आदींची उपस्थिती हाेती. शिबिरास पालकमंत्री राजेश टोपे, आमदार कैलास गोरंट्याल, माजी मंत्री अर्जुन खोतकर, पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी भेट दिली.
शहरातील शिक्षक पतसंस्थेत आयोजित शिबिराचे उद्घाटन माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या पदाधिकारी, सदस्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. यावेळी राज्य कार्याध्यक्ष बाबूराव पवार, जिल्हाध्यक्ष मंगेश जैवाळ, विकास पोथरे, महिला आघाडीच्या सरला पवार, वैशाली कुलकर्णी, सुनील ढाकरके, तानाजी राठोड, जगन्नाथ शिंदे, प्रमोद भागवत, भारत गडदे, श्रीकांत रुपदे, सुनील साबळे, हापिजुर पठाण, नीलेश सोमवंशी, रवी तारो, पंढरीनाथ खरात, गजानन इलग, रमेश दंदाले, पंकज गोरे, दिनेश पघळ, विलास गिराम, किरण कुलकर्णी, साधना गिऱ्हे, नीता पाटील, सुरेखा ताटीकोंडा, रेणुका आडेप, कल्पना पेंटेवाड, सुवर्णा देशमुख, मनीषा शिंदे, मंजूषा तागड, अनिता पवार, शुभांगी कुमठेकर आदींची उपस्थिती होती.
केदारखेडा ग्रामपंचायत कार्यालयात आज शिबिर
केदारखेडा : येथील ग्रामपंचायत कार्यालयात सोमवारी सकाळी १० वाजता ‘लोकमत रक्ताचं नातं’ उपक्रमांतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. लोकमत व ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने आयोजित शिबिराचे उद्घाटन आमदार संतोष दानवे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे, तहसीलदार संतोष गोरड, जि.प. सदस्य डॉ. चंद्रकांत साबळे, जि.प. सदस्य कैलास पुंगळे, सरपंच सतीश शेळके, राष्ट्रवादीचे तालुका युवक अध्यक्ष अंकुश जाधव, शिवसेना तालुका प्रमुख माधवराव हिवाळे, रामेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव केशव जंजाळ, नंदकुमार गिऱ्हे, प्रा. भगवान डोंगरे, प्रा. विकास वाघ आदींची उपस्थिती राहणार आहे.
समाज जागृतीचे काम
‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाने आजवर विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. ‘लोकमत’ केवळ वृत्तपत्र नसून सामाजिक चळवळ आहे. समाजाच्या जडणघडणीत ‘लोकमत’चा वाटा आहे. ‘लोकमत रक्ताचं नातं’ हा उपक्रम प्रेरणादायी असून, उपक्रमातून संकलित होणाऱ्या रक्तामुळे अनेकांचे प्राण वाचणार आहेत. समाजातील सर्व घटकांनी या रक्तदानाच्या महायज्ञात सहभागी व्हावे.
- मंगेश जैवाळ, जिल्हाध्यक्ष,
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद