शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
4
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
5
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
6
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
7
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
9
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
10
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
11
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
12
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
13
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
14
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
15
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
16
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
17
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
18
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
19
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
20
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण

lok sabha election 2019 : खोतकरांच्या माघारीने ‘कहीं खुशी कहीं गम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 20:11 IST

जी आश्वासने त्यांना देण्यात आली, नंतर ती भाजपकडून पाळलीच जातील का, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. 

- संजय देशमुख 

जालना : गेल्या तीन महिन्यांपासून भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांच्या विरोधात दंड थोपटणारे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी माघार घेतल्याचे परिणाम हे युतीसाठी सकारात्मक आहेत. यातून खोतकरांनी बरेच काही पदरात पाडून घेतले असले तरी जी आश्वासने त्यांना देण्यात आली, नंतर ती भाजपकडून पाळलीच जातील का, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. 

खोतकरांच्या माघारीने काँग्रेसही अप्रत्यक्षपणे अडचणीत सापडल्याचे वास्तव आहे. खोतकरांनी माघार न घेता दानवेंशी दोन हात करावेत, अशी अनेकांची इच्छा होती. ही इच्छा खोतकरांनी चांगलीच तापतही ठेवली होती. शेवटपर्यंत आपण काय करणार, हे त्यांनी गुलदस्त्यात ठेवले होते. खऱ्या अर्थाने सहकारमंत्री सुभाष देशमुख हे मुख्यमंत्र्यांचे विश्ोष दूत म्हणून आल्यावरच खोतकरांची तलवार म्यान झाली होती. मात्र अचानकपणे आपण माघार घेत असल्याचे जाहीर केले असते तर ते शिवसैनिकांसाठी क्लेशकारक ठरले असते. त्यामुळे त्यांनी माघारीचा मुद्दा चांगलाच ताणून धरला होता. मात्र, आता हा सर्व इतिहास झाला असून मनोमिलन होताच खोतकर यांनी सोमवारी रावसाहेब दानवे यांची त्यांच्या भोकरदन येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. तसेच त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या. त्यामुळे खोतकरांमधील हा बदल निश्चित चर्चेचा विषय ठरला. खोतकरांनी ज्या मुद्यांवर माघार घेतली, त्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उमेदवारी मिळावी म्हणून फासे टाकले आहेत. तसेच जालना कृषी उत्पन्न बाजार समिती, तूर घोटाळा, दुकानांचे झालेले लिलाव आणि रामनगर सहकारी साखर कारखान्याची जमीन हे हुकमी पत्ते भाजपकडे अर्थात रावसाहेब दानवेंकडे होते. त्यामुळे जास्त न ताणता खोतकर यांनी माघारीचे अस्त्र स्वीकारले. 

काँग्रेससमोर पेचखोतकरांच्या माघारीने काँग्रेसमध्येही चलबिचल झाली आहे. खोतकर येणार-येणार अशा गोबेल्स नीतीचा सक्षमपणे उपयोग करून काँग्रेसच्या नेतृत्वालाही त्यांनी गाफील ठेवल्याची जोरदार चर्चा आता सुरू आहे. खोतकरांचे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे दृढ संबंध सर्वश्रुत आहेत. त्यातच आता माजी आ. कल्याण काळे यांना उमेदवारी देण्याचे प्रयत्न काँग्रेसकडून केले जात आहेत. मात्र, त्यांची इच्छा नसल्याने नवीन पेच काँग्रेससमोर निर्माण झाला आहे.  

हे नवे नाही...खोतकरांच्या माघारीबद्दल माजी आ. कैलास गोरंट्याल यांना विचारले असता ते म्हणाले की, हा युतीचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यामुळे त्यावर आपण भाष्य करणार नाही. एवढे करूनही जर आगामी विधानसभेत ते माझ्या विरोधात उभे राहिले तर हे काही माझ्यासाठी नवीन नसल्याचे गोरंट्याल म्हणाले.  

टॅग्स :Arjun Khotkarअर्जुन खोतकरRaosaheb Danweरावसाहेब दानवेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकJalanaजालना