शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे, 'मुंगेरीलाल के हसीन सपने' : मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 15:30 IST

मुख्यमंत्र्यांची खोचक टीका

जालना : काँग्रेसने गेल्या ६० वर्षामध्ये गरीबी हटावचा नारा दिला होता. परंतु, देशातील गरीबी हटण्यापेक्षा ती अधिक वाढली आहे. आता त्यांनी पुन्हा एकदा गरिबी हटविण्याचा मुद्दा त्यांच्या जाहीरनाम्यात घेतला आहे. हे म्हणजे, 'मुंगेरीलालके हसीन सपने' असल्याची खोचक  टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (दि. २) जालना येथे आयोजित सभेत केली. 

मुख्यमंत्री फडणवीस हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी जालन्यात आले होते. यावेळी केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खा. रावसाहेब दानवे, पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आ. संदिपान भुमरे, आ. नारायण कुचे, आ. संतोष दानवे, आ. अतुल सावे, जि. प. अध्यक्ष अनिरूद्ध खोतकर, शिवसेना जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या पाच वर्षामध्ये शेवटच्या घटकांपर्यंत विकासाच्या योजना पोहचविल्या आहेत. मोदी सरकारच्या काळात दुष्काळासाठी चार हजार ७०० कोटी रूपये मिळाले असून त्यामुळे भरीव मदत झाली आहे. 

खोतकर पांडवांच्याच कळपात मध्यंतरी रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यात तेढ निर्माण झाले होते. परंतु, पार्थरूपी उद्धव ठाकरे यांनी त्यांची समजूत काढली. आणि काँग्रेसच्या वाटेवर असलेले खोतकर हे पांडवांच्याच कळपात राहिले असा मिश्किल टोलाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९jalna-pcजालनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा