शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अभंग, भाव आणि भक्तिगीतांनी रसिक भारावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 01:05 IST

माझे माहेर पंढरी..., काटा रूते कुणाला..., घेई छंद मकरंद..., बाजे रे मुरलिया..., या व अन्य भाव, भक्ती आणि नाट्य गीतांंनी जालनेकरांची शुक्रवारची संध्याकाळ अजरामर केली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : माझे माहेर पंढरी..., काटा रूते कुणाला..., घेई छंद मकरंद..., बाजे रे मुरलिया..., या व अन्य भाव, भक्ती आणि नाट्य गीतांंनी जालनेकरांची शुक्रवारची संध्याकाळ अजरामर केली. निमित्त होते ते गुढीपाडव्यानिमित्त आयोजित मर्मबंधातील ठेव या संगीत मैफिलीचे.येथील रूक्मिणी गार्डनमध्ये प्रसिद्ध गायक प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या मैफलीत जालनेकर रसिकांची लक्षणीय उपस्थिती लावली होती. प्रारंभी मतदान जागृती करणारे संदेश देण्यात आले. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. यावेळी लागली समाधी ज्ञानेशाची हा अभंग प्रथमेश लघाटे यांनी सादर केला. तर बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल हा अभंग मुग्धा वैशंपायन यांनी सादर करून रसिकांना भक्तिरसात नेले. यावेळी पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी संगीतबद्ध केलेले काटा रूते कुणाला आक्रंदात कोणी मज फूलही रूतावे हा दैवयोग आहे. हे रंजित देसाई लिखित हे बंध रेशमाचे या नाटकातील पद प्रथमेश लघाटे यांनी सादर केले.या व अन्य गाण्यांसह अनेक भक्तिगीते सादर करण्यात आली. यावेळी गायिका मुग्धा वैशंपायन हिचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी तबल्यावर प्रथमेश देवधर, पखवाज उद्धव गोळे, हार्मोनियम उमेश पुरोहित, विश्वास कलमकर, अविनाश थिगले यांनी ही मैफल यादगार व्हावी म्हणून पुढाकार घेतला. सूत्रसंचालन किशोर देशपांडे यांनी केले.

टॅग्स :musicसंगीतReligious programmeधार्मिक कार्यक्रम