शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याने केली मेंढीची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 00:08 IST

घनसावंगी तालुक्यातील गोदाकाठच्या गावांत बिबट्याने हैदोस घातला आहे. मंगळवारी मध्यरात्री बिबट्याने रामसगाव शिवारात एका मेंढीची शिकार करीत तिला फस्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कतीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यातील गोदाकाठच्या गावांत बिबट्याने हैदोस घातला आहे. मंगळवारी मध्यरात्री बिबट्याने रामसगाव शिवारात एका मेंढीची शिकार करीत तिला फस्त केले.बीड जिल्ह्यातील मेंढपाळ लक्ष्मण कळसकर हे गत दोन महिन्यांपासून रामसगाव परिसरात मेंढ्या चराईसाठी आलेले आहेत. शेतात दररोज वेगवेगळा मुक्काम करीत ते वास्तव्य करतात. त्या बदल्यात त्यांना ज्वारी व काही पैसे मोबदला मिळतो आणि मेंढ्याच्या चा-याची व्यवस्थाही होते. रामसगाव शिवारातील शिवाजी भालेकर यांच्या शेताजवळ मंगळवारी ते रात्री मुक्कामास होते.बुधवारी सकाळी मेंढ्या चरण्यासाठी मोजदाद सुरू केली असता एक मेंढी आढळली नाही. त्यांनी शोध घेतला असता परिसरातच एक मेंढी मृत व अर्धवट अवस्थेत आढळून आली. बाजुला बिबट्याच्या पायाचे ठसे दिसून आले.दरम्यान, एकलहेरा येथे गाय-वासरू तर रामसगाव येथे काळविटाची बिबट्याने शिकार केल्याची घटना विस्मरणात जात नाही तोच मंगळवारी ही घटना घडली. यामुळे पशुपालकांत दहशतीचे वातावरण पसरले असून, वन विभागाने मात्र अद्याप शोध मोहीम सुरू केली नसल्याचे समजते.