शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

शेतातील हौदात पडला बिबट्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 00:25 IST

तळणी : मंठा तालुक्यातील नायगाव परिसरातील शेतात हौदात बिबट्या पडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पहिल्यांदाच बिबट्या आढळून आल्याने सर्वत्र ...

तळणी : मंठा तालुक्यातील नायगाव परिसरातील शेतात हौदात बिबट्या पडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पहिल्यांदाच बिबट्या आढळून आल्याने सर्वत्र घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. तब्बल दोन तास होऊनही घटनास्थळी वन विभागाचे कर्मचारी पोहोचले नव्हते. घटनेची माहिती पालकमंत्री लोणीकर यांना दिल्यानंतर त्यांनी संबंधिताना सूचना केली. त्यानंतर वन विभागाचे अधिकारी घटनास्थळाकडे रवाना झाले.नायगाव (ता. मंठा) येथील एकनाथ हरिभाऊ फुफाटे यांच्या शेतातील गट क्र. ६९ मध्ये एक हौद असून 'त्या' हौदात ३ वाजेदरम्यान नारायण भानुदास फुफाटे हे शेतात जात असताना बिबट्याचा आवाज आल्याने हौदात पाहिले तर बिबट्या पडलेला दिसला. त्यांनी कळविल्यावर सरपंच गजानन फुफाटे व उपसरपंच अविनाश राठोड घटनास्थळी आले. त्यांनी महसूल व वन विभागाला माहिती दिली. मात्र सायंकाळी ५ वाजेपर्यंत घटनास्थळी कोणीच पोहोचले नसल्याने पालकमंत्री बबनराव लोणीकर यांना कळविले. त्यांनी सूचना केल्यानंतर वनरक्षक अधिकारी घटनास्थळाकडे रवाना झाले. बघ्यांची गर्दी जमली होती. त्याचबरोबर ग्रामस्थांत घबराटीचे वातावरण पसरले होते.