शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या हल्ल्यात चौघे गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 00:22 IST

भोकरदन तालुक्यातील वालसावंगी (सुंदरवाडी) येथे बिबट्याने अचानक चौघा जणांवर हल्ला करुन गंभीर जखमी केल्याची घटना शनिवारी घडली

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन/वालसावंगी : भोकरदन तालुक्यातील वालसावंगी (सुंदरवाडी) येथे बिबट्याने अचानक चौघा जणांवर हल्ला करुन गंभीर जखमी केल्याची घटना शनिवारी घडली. अचानक बिबट्याने हल्ला केल्याने परिसरात शेतकऱ्यांमध्ये धास्ती पसरली आहे. वनपालासह तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत़ किशोर निकम, सुनील हरिभाऊ गवळी, वनपाल संतोष दोडके, प्रमोद पांडुरंग गवळी हे जखमी झाले.किशोर योगीराज निकम (२८) व प्रमोद गवळी रा सुंंंदरवाडी (वालसावंगी) हे दोघे जण शनिवारी वालसावंगीच्या शिवारातील गायरानात शेळ्या चारण्यासाठी गेले होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास बिबट्याने किशोर निकम यांच्यावर पाठिमागून अचानक हल्ला केला. किशोर यींनी आरडा ओरड केल्याने शेजारीच असलेल्या प्रमोद गवळी यांनी बिबट्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला असता, प्रमोद गवळी यांच्यावर त्याने हल्ला चढविला. आरडा ओरड केल्याने परिसरातील शेतकरी जमा झाले. यामुळे बिथरलेल्या बिबट्याने परिसरातील झाडीत आश्रय घेतला. बिबट्याने दोघा जणांवर हल्ला केल्याची घटना गावात वाऱ्यासारखी पसरली. तसेच ग्रामस्थांनी वनविभागालाही याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच वनपाल संतोष दोडके, भोकरदनचे वनसंरक्षक दिलीप जाधव, जाफराबादचे वनरक्षक सोनू जाधव हे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.ग्रामस्थांनी सांगितलेल्या ठिकाणी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याची शोधाशोध सुरु केली. वनपाल संतोष दोडके हे वालसावंगी शिवारातील गायरानामध्ये पोहोचले व बिबट्याचा शोध सुरू केला. दोडके यांनी एका झाडावर जाऊन बिबट्याचा शोध घेतला तेव्हा बिबट्या झाडाच्या थोड्या दूरवर असलेल्या झुडपामध्ये बसलेला त्यांना दिसला. त्यांनी सर्वांना बाजूला जाण्याचा सल्ला दिला.संतोष दोडके हे झाडावरून खाली उतरताच दडून बसलेल्या बिबट्याने संतोष दोडके यांच्यावर झेप घेऊन उजव्या हाताला चावा घेतला व डोक्यावर मोठी जखम केली. या हल्ल्यामुळे संतोष दोडके यांनी घाबरून न जाता बिबट्याशी दोन हात करून त्याच्यावर काठीने प्रतिहल्ला चढविला. त्याच बरोबर वनसंरक्षक सोनू जाधव, दिलीप जाधव, युवराज बोराडे यांनी बिबट्याला काठ्यांनी झोडपून संतोष दोडके यांची बिबट्याच्या तावडीतून सुटका केली.यावेळी उपस्थित असलेल्या मोठा जमावाला मात्र पळता भुई थोडी झाली.सुदैवाने बिबट्या मागच्या बाजूला पळाला. त्यामुळे पुढचा अनर्थ टळला. एकूणच या बिबट्याशी झुंज देताना वनपाल दोडके यांनी जी हिंमत दाखवली, त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. वन विभागाने ग्रामस्थांना रात्री एकटे बाहेर न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत.हल्ला : काठ्याच्या भरवशावर सामनावालसावंगी परिसरातील गायरानात बिबट्याने दोन शेतमजुरांवर हल्ला करून जखमी केल्याची माहिती मिळाल्यानंतर वनपाल संतोष दोडके, वनरक्षक सोनू जाधव, दिलीप जाधव हे तीन कर्मचारी घटनास्थळी गेले. त्यांच्या हातात केवळ काठ्या होत्या, काठी घेऊन ते जंगलात बिबट्याचा शोध घेत होते. खरोखरच बिबट्याचा काठीने मुकाबला होऊ शकतो का, अशी परिस्थिती आहे. मात्र सुदैवाने या बिबट्याच्या हल्यामध्ये वनपालाचा जीव वाचला आहे त्यांच्या डोक्यात मोठी जखम झाली असून उजव्या हाताला चावा घेतल्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत. शिवाय किशोर निकम यांच्या हातावरही मोठ्या जखमा झाल्या आहेत़बिबट्याला न पकडताच वन विभागाचे पथक फिरले माघारीबिबट्याला पकडण्यास गेलेल्या वन विभागाच्या अधिकाºयावरच बिबट्याने हल्ला केल्यामुळे वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घाबरून गेले होते. हल्ल्यानंतर संतोष दोडके हे भोकरदनला आले त्यांच्या सोबत वनसंरक्षक सोनू जाधव सुध्दा होत्या. या ठिकाणी दोडके यांच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार करण्यात आले, त्यानंतर त्यांना जालना येथे पाठविण्यात आले़भोकरदन तालुक्यात गेल्या पंधरा दिवसां पासून बिबट्याची मोठी दहशत निर्माण झाली आहे गेल्या आठवड्यात कल्याणी, कुकडी परिसरात तीन शेळ्या व एका बैलाचा बिबट्याने फडशा पाडला होता तर अवघडराव सावंगी परिसरातील कुलमखेड जिल्हा बुलडाणा येथील शेतक-यावर २२ मार्च रोजी बिबट्याने हल्ला करून जखमी केले होते.त्यामुळे तालुक्यातील धावडा, वालसावंगी, आन्वा, पिंपळगाव रेणुकाई, पारध परिसरात बिबट्याच्या दहशतीमुळे शेतक-यांनी रात्रीच्या वेळी घराबाहेर झोपणे टाळावे तसेच शेतात जाताना एकटे जाण्या ऐवजी गटा-गटाने जावे, असे आवाहन केले आहे.

 

टॅग्स :leopardबिबट्याforest departmentवनविभाग