शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नेत्यांच्या सभांचे २० पथकांमार्फत होतेय चित्रीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 01:11 IST

आचारसंहितेचा भंग होऊ नये, यासाठी २० पथकांमार्फत नेत्यांसह उमेदवारांच्या सभांचे व्हिडिओ चित्रीकरण केले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : विधानसभा निवडणुकीतील प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आहे. प्रचाराच्या धामधुमीत आचारसंहितेचा भंग होऊ नये, यासाठी २० पथकांमार्फत नेत्यांसह उमेदवारांच्या सभांचे व्हिडिओ चित्रीकरण केले जात आहे. दुसरीकडे मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी निवडणूक विभागाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. मतदारांच्या अडचणी सोडविण्यासाठी १९५० हा टोलफ्री क्रमांकही सुरू करण्यात आला आहे.विधानसभा निवडणूक प्रक्रियेत उमेदवारांचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. आपल्याच पक्षाचा विजय व्हावा, यासाठी उमेदवारांसह राष्ट्रीय, राज्यस्तरावरील नेतेही प्रचाराच्या आखाड्यात उतरले आहेत. सभा, कॉर्नर बैठका, मतदारांच्या थेट भेटींसह सोशल मीडियावरही प्रचाराचा धुराळा उडविला जात आहे. या धामधुमीत आचारसंहितेचा भंग होऊ नये, यासाठी निवडणूक विभागाकडून २० व्हीएसटी पथकांमार्फत व्हिडिओ चित्रीकरण केले जात आहे. पथकांमार्फत होणाऱ्या व्हिडिओ चित्रीकरणाची तपासणी जिल्हाधिकारी कार्यालयातील पथक करीत आहे. याचा दैनंदिन अहवाल जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिला जात आहे. त्याशिवाय वाहनांची तपासणीही ठिकठिकाणी केली जात आहे.मतदानाच्या दिवशी प्रत्येक मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे, व्हिडिओ चित्रीकरण, पोलीस बंदोबस्त, पाणी, स्वच्छतागृह, रॅम्प, लाईट, फर्निचर यासह इतर मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.वोटर स्लीप वाटपाचे काम ५० टक्के पूर्ण झाले असून, मतदान जागृती, मतदान कसे करावे, याबाबत निवडणूक विभागाकडून वोटर गाईड देण्यात आले आहे. प्रत्येक कुटुंबात एक वोटर गाईड देण्यात येणार आहे. मतदारांना कोणतीही अडचण आली तर ती सोडविण्यासाठी १९५० हा टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आला आहे. एकूणच जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक प्रक्रियेत अधिकाधिक प्रमाणात मतदान व्हावे, यासाठी निवडणूक विभाग आवश्यक ती दक्षता घेत आहे.सात ठिकाणी सखी केंदे्रजिल्ह्यात सात मतदान केंद्र हे सखी मतदान केंद्र म्हणून राहणार आहेत. येथील संपूर्ण कामकाज महिला अधिकारी, कर्मचारी पाहणार आहेत. त्यांच्यासाठीही आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.३८ संवेदनशील मतदान केंद्रेजिल्ह्यात ३८ मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. त्यामुळे या मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलीस प्रशासनामार्फत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. शिवाय काटेकोर बंदोबस्तही या केंद्रांवर लावण्यात येणार आहे.

 

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगCode of conductआचारसंहिता