शहरं
Join us  
Trending Stories
1
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
2
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
3
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
4
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
5
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
6
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
7
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
8
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
9
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
10
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
11
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
12
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
13
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
14
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
15
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
16
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
17
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
18
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
19
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
20
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

जमीनीचे क्षेत्रच गायब, शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 01:04 IST

धावडा येथील गट कं्रमाक ९८ मधिल काही एकर जमीन ही त तत्कालीन जिल्हाधिकाºयांनी संबंधित शेतकºयांच्या नावावर करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, चार वर्षानंतरही ही जमीन शेतकºयांच्या नावावर न झाल्याने अडचण निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देधावडा येथील शासन जमीनी : २२ शेतकऱ्यांना चिंता

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : धावडा येथील गट कं्रमाक ९८ मधिल काही एकर जमीन ही त तत्कालीन जिल्हाधिकाºयांनी संबंधित शेतकºयांच्या नावावर करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, चार वर्षानंतरही ही जमीन शेतकºयांच्या नावावर न झाल्याने अडचण निर्माण झाली आहे.ज्या शेतकºयांनी एकवर्षा पेक्षा जास्त गायराण जमीनीवर अतिक्रमण केल्याचे चौकशीत आढळून आले अशा २२ शेतकºयाना तात्कालीन सहाय्यक जिल्हाअधिकारी संजीवकुमार यांनी ९८ गट क्रमांकातून मारोती साबळे, १ हेक्टर २० आर, काशीनाथ निकाळजे २ हेक्टर, कचरू इंगळे, १ हेक्टर २० आर रामदास इंगळे १ हेक्टर २० आर, भीमराव साबळे १ हेक्ब्टर २० आर, सुगरनबाई खैरे १ हेक्टर ६० आर, जममुनाबाई वैरी १ हेक्टर २० आर, अलकाबाई पारव १ हेक्टर २० आर, भाऊलाल वैरी १ हेक्टर २० आर, शेख इब्राहीम १ हेक्टर २० आर, शेख कलाम १ हेक्टर २० आर, शेख रऊफ २ हेक्टर, शेख बिसमिल्ला २ हेक्टर शेरखॉ सरदारखॉ १ हेक्टर ६० आर, शेख मसुद शेख गफुर २ हेक्टर, युसूफखॉ अजगरखाू २ हेक्टर, कलाबाई बिरभाड १ हेक्टर २० आर, सय्यद शेकुर सय्यद गफुर १ हेक्टर ६० आर, उत्तम निकाळजे १ हेक्टर २० आर, नामदेव इंगळे १ हेक्टर २० आर अशी पती - पत्नीच्या नावे जमीन करण्यात येऊन त्या संबधी या शेतकºयाची सातबारा उताºयावर त्याची नावे घेण्यात आली होती. या शेतकºयानी सदरील शेतीवर बँकेकडून पिककर्ज सुध्दा घेतले, मात्र गेल्या चार वर्षा पासून पोटखराब असल्याच्या कारणा वरून शेतकºयाच्या सातबारावरील नावा समोरून जमीनचे क्षेत्रच गायब झाले आहे. त्यामुळे या शेतकºयांना या शेतीचा केवळ कसण्यासाठीच उपयोग होत असुन पीककर्ज घेता येत नाही. शासनाने यावर्षी पीककर्ज माफीमध्ये काही शेतकºयाची कर्जमाफी सुद्धा झाली आहे, तर काहींनी १ लाख ५० हजार माफीनंतर उर्वरित राहिलेली रक्कम सुध्दा बँकेत भरणा केली. मात्र, नव्याने कर्ज घेण्यास गेल्यावर सातबारा उताºयामध्ये या शेतकºयांची नावे आहेत. मात्र, नावासमोरील जमीनीचे क्षेत्रच गायब झाले आहे सुरूवातील आॅनलाईन सातबाºयामध्ये काही बिघाड झाली म्हणून काही दिवस या शेतकºयांनी तलठ्याकडे वचारणा केली. मात्र, त्यात तसे काही चुकीचे झाले नसल्याचे दिसून आल्याने शेतकºयांची अडचण कायम आहे .शेतकरी : जिल्हाधिकाºयांनी लक्ष द्यावेभोकरदन तालुक्यातील धावडा येथील गट क्रमांक ९८ मधील काही शेत जमीन ही तत्कालीन सहायक जिल्हाधिकारी संजीव कुमार यांनी संबंधित शेतकºयांच्या नावावर करून दिली होती. मात्र, त्यातील तांत्रिक दोष आजही १२ वर्षानंतर दूर झाले नाहीत. त्यामुळे जिल्हाधिकारी बिनवडे यांनीच आता लक्ष देण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.

टॅग्स :Jalanaजालनाcollectorजिल्हाधिकारी