शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात बांधकाम परवानगीचे त्रांगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 00:59 IST

गेल्या काही महिन्यांपासून जालना नगर पालिकेला पूर्णवेळ नगररचनाकार मिळत नसल्याने शहरातील बांधकामावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गेल्या काही महिन्यांपासून जालना नगर पालिकेला पूर्णवेळ नगररचनाकार मिळत नसल्याने शहरातील बांधकामावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. राज्य सरकारच्या नगररचना विभागाकडून हे पद पालिकेत भरले जाते. मात्र, जालन्यात कोणताच अधिकारी येण्यास उत्सुक नसल्याने बांधकाम व्यावसायिक आणि नागरिक हैराण झाले आहेत.जालना पालिकेत गेल्या चार ते पाच वर्षापासून पूर्णवेळ नगररचना काराचे पद रिक्त आहे. या पदाचा प्रभारी पदभार गेली कित्येक वर्षे जिल्हा नगर रचनाकाराकडे आहे. मध्यंतरी तर त्यांच्याकडील पदभारही त्यांनी सोडून दिला आहे. महिन्याभर एक नगरचना विभागातून अधिकारी आले होते. मात्र त्यांची देखील आता बदली झाली आहे. औरंगाबाद येथील गोडघासे यांच्याकडे हा पदभार होता, मात्र ते देखील येथे येण्यास उत्सुक नाहीत. एकूणच पालिकेने सर्व बांधकाम परवागीची प्रक्रिया ही आॅनलाईन केली आहे. मात्र ही प्रक्रिया कुचकामी ठरत असल्याचे वास्तव आहे.या संदर्भात लोकमतने पुणे येथील नगररचना विभागातील संचालक शेंडे यांच्याशी सपंर्क केला असता ते बैठकीत असल्याचे सांगण्यात आले. जालना जिल्हा नगररचनाकारांकडे विचारणा केली असता, माझ्याकडे असलेला प्रभारी पदभार मी केव्हाच सोडल्याचे त्यांनी सांगितले. बांधकाम विभागाप्रमाणेच अन्य विभागातही पािलकेत अशीच स्थिती असल्याने त्याच्या एकूणच कामकाजावर परिणाम होत आहे.बांधकाम परवानगी न मिळाल्याने अनेकांचे बँकेकडून घेण्यात येणारी कर्जप्रकरणे अडचणीत सापडली आहेत. जवळपास ५०० पेक्षा अधिक प्रकरणांमध्ये बांधकाम परवानगी न मिळाल्याने बांधकाम व्यावसायिक तसेच नागरिकांची मोठी डोकेदुखी होत आहे. के्रडाई या बांधकाम क्षेत्रातील संघटनेने या संदर्भात जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्तांना भेटून निवेदने दिली. मात्र त्याची दखल घेतली गेली नसल्याने ही संघटनाही हतबल झाली आहे.नगर रचना : अधिकारी येण्यास धजेनाराज्य सरकारकडे या संदर्भातील तक्रारी या खाजगी पातळीवरून थेट मंत्रालयात गेल्या आहेत. तेथून नगररचना विभागाला सांगण्यात येऊनही या विभागातील अधिकारी नेमेके कोणत्या कारणामुळे जालना पालिकेत येत नाहीत, हा संशोधनाचा विषय असल्याचे बोलले जात आहे. राज्य सरकार अर्थात जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनीच आता लक्ष घालून थेट नगररचना विभागाच्या सचिवांनाच साकडे घालून हे पद भरल्यास मार्ग निघू शकेल असे बोलेले जात आहे.नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल तसेच त्यांचे पती आणि माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी पालिकेतील ४२ महत्वाची पदे भरण्यासाठी शासन दरबारी मोठा पाठपुरावा केला. त्यांना कुठूनच साथ मिळत नसल्याने ते देखील वैतागले आहेत.

टॅग्स :Jalana Muncipalityजालना नगरपरिषदState Governmentराज्य सरकार